जिजाऊ अर्बन पतसंस्थेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:26 IST2021-01-15T04:26:24+5:302021-01-15T04:26:24+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अभिमन्यू खोतकर, राजेश राऊत, भाऊसाहेब घुगे, गणेश घुगे, सिद्धिविनायक ...

Inauguration of Jijau Urban Credit Union | जिजाऊ अर्बन पतसंस्थेचे उद्घाटन

जिजाऊ अर्बन पतसंस्थेचे उद्घाटन

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अभिमन्यू खोतकर, राजेश राऊत, भाऊसाहेब घुगे, गणेश घुगे, सिद्धिविनायक मुळे, सदाशिव कोल्हे, डॉ. आदिनाथ पाटील, डाॅ. रामेश्वर वरकड, डॉ. किशोर टेपले, बबनराव बोरूडे, दीपक दहेकर, जगत घुगे, बाला परदेशी, तुळशीराम शेळके, पी. एम. देशमुख, मनोहर जाधव, अध्यक्ष कविता, सुलोचना शेळके, कुशिवर्ता मालुसरे, अश्विनी जाधव यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिजाऊ अर्बनचे स्थानिक सल्लागार मंडळाचे अध्यक्ष गजानन पाटील वाळके यांनी करून पतसंस्थेच्या विविध ठेव, कर्ज योजना व सोयी-सुविधांची माहिती सांगितली. तेजस्विनी दामदुप्पट योजनेला उल्लेखनीय प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला महिला संचालक मंडळांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ अर्बन दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. सर्व संचालक मंडळाचा सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन मनीषा पाटील यांनी केले.

Web Title: Inauguration of Jijau Urban Credit Union