वाढोना येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:57 IST2021-03-04T04:57:44+5:302021-03-04T04:57:44+5:30

त्या जोड रस्त्याच्या कामात अनियमितता जालना : अंबड तालुक्यातील भणंग जळगाव आणि घनसावंगी तालुक्यातील एकलहेरा या गावापासून ...

Inauguration of cricket tournament at Wadhona | वाढोना येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

वाढोना येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

त्या जोड रस्त्याच्या कामात अनियमितता

जालना : अंबड तालुक्यातील भणंग जळगाव आणि घनसावंगी तालुक्यातील एकलहेरा या गावापासून राज्य रस्त्याला जोडलेल्या फाट्यापर्यंत प्रत्येकी दीड किलोमीटर रस्त्याचे काम करण्यात आले असून, या कामात अनियमितता झाली आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करता थातुरमातुर करण्यात आले असून, या कामाची चौकशीची मागणी अशोक खापे यांनी सीईओंकडे केली.

उद्धव गिते यांना समाजभूषण पुरस्कार

बदनापूर : येथील पद्मभूषण डॉ. बद्रीनारायण बारवाले विद्यालयाचे सहशिक्षक तथा समाज प्रबोधनकार शिवव्याख्याते उद्धव गिते यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल बहुभाषिक संत वामनभाऊ व संत भगवानबाबा वंजारी संघ पुणे यांच्यातर्फे समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. वंजारी संघातर्फे त्यांना राज्य समाजभूषण पुरस्कार समितीच्या वतीने आळंदी येथे प्रदान करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्षा लक्ष्मी गरकळ यांनी सांगितले.

सीटीएमकेत माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर

जालना : जालना शहरातील सीटीएमके विद्यालयातील १९८६-८७-८८ या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम नुकताच पार पडला. या वेळी सर्वांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज आणि सरस्वती पूजन करण्यात आले. या वेळी श्रीकिशन झंवर, संजय भवने, राजू पोरवाल, अनिल हजारे, नितीन पोळ, विजय तिवारी, साईनाथ पवार, शेषनारायण टापरे, ॲड. रमेश धामणगावकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Inauguration of cricket tournament at Wadhona