शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित... कोरोना आला, इतर आजार गेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:39 IST

जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या दैनंदिन सरासरी सातशे ते आठशेच्या आसपास आहे. महिन्याकाठी सरासरी २० ते २४ ...

जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या दैनंदिन सरासरी सातशे ते आठशेच्या आसपास आहे. महिन्याकाठी सरासरी २० ते २४ हजार रुग्ण रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येत होते; मात्र कोरोनाचा शिरकाव झाला आणि ओपीडीत येणाऱ्या रुग्णांची संख्या सरासरी पाच हजारांवर आली. विशेषत: कान, नाक, घसा, ताप आदी आजारांच्या रुग्णांच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. विशेषत: सर्दी, खोकला, ताप ही कोरोनाची लक्षणे आहेत. त्यामुळे रुग्णालयात गेलो तर तपासणी होईल किंवा संशयित म्हणून अलगीकरणात टाकले जाईल, अशा भीतीने अनेकांनी घरगुती उपचार घेण्यावर भर दिला. काही रुग्णांनी खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करण्यावर भर दिल्याचेही दिसून येत आहे. एकीकडे बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसंख्येत घट झाली आहे. नोव्हेंबरपासून रुग्णालयात उपचारास येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. डिसेंबर महिन्यात रुग्णालयातील ओपीडीत आठ हजारांवर रुग्णांनी उपचार घेतले; मात्र गतवर्षीच्या तुलनेत जवळपास १६ हजाराने घट झाल्याचे दिसून येत आहे.

इतर आजारांपेक्षा कोरोनाचीच अधिक भीती

सर्दी, खोकला, ताप ही कोरोनाची असलेली लक्षणे, उच्च रक्तदाब आणि मधुमेह असलेल्या रुग्णांना कोरोनामुळे असलेला धोका हा अनेकांच्या मनात घर करून बसला होता. त्यामुळे खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेणे किंवा सर्दी, खोकला, तापावर घरगुती उपचार करण्यावर भर दिला आहे. सध्या विविध आजारांचे रुग्ण वाढत असले तरी कोरोनामुळे शासकीय रुग्णालयात येणाऱ्यांची संख्या घटली आहे.

ओपीडीमधील संख्या

२०२० २०१९ २०१८

जानेवारी १८३०७ २३०२७ २४८१५

फेब्रुवारी २०००१ १९४२० २३४९९

मार्च १७९२५ १८८०४ १८९२१

एप्रिल १६२६५ १५६५८ ०५१४५

मे १६९६२ १६६४३ ०३५८०

जून १६८५३ १७३३८ ०४०८७

जुलै २१००० २४८३६ ०८३९६

ऑगस्ट २०२१४ २३३७४ ०५०२१

सप्टेंबर २२२१८ २३४४७ ०५५२१

ऑक्टोबर २३९३४ २२१७० ०५८८६

नोव्हेंबर १७२०१ २४९१७ ०६५७०

डिसेंबर १८५४७ २४४७९ ०८२५९