शहागडमध्ये संत रविदास महाराजांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:34 IST2021-03-01T04:34:25+5:302021-03-01T04:34:25+5:30

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातचा धोका जालना : जालना ते सिंदखेडराजा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ ...

Greetings to Saint Ravidas Maharaj in Shahagad | शहागडमध्ये संत रविदास महाराजांना अभिवादन

शहागडमध्ये संत रविदास महाराजांना अभिवादन

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघातचा धोका

जालना : जालना ते सिंदखेडराजा मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. शिवाय अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचीही संख्या मोठी आहे. परंतु, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधितांनी लक्ष देऊन रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची मागणी

जालना : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घ्यावा, अन्यथा भाजप महिला मोर्चाच्या वतीने व्यापक आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस संध्या देठे, जिल्हाध्यक्षा उषा पवार, शहराध्यक्षा सीमा बिर्ला, शहर उपाध्यक्षा ममता कोंड्याल, चिटणीस प्रीती पालीवाल यांच्यासह महिला पदाधिकारी, सदस्य उपस्थित होत्या.

Web Title: Greetings to Saint Ravidas Maharaj in Shahagad