विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST2021-02-16T04:32:08+5:302021-02-16T04:32:08+5:30

परतूर : शासनाच्या शिष्यवृत्तीपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी मुख्याध्यापकांनी घ्यावी, अशी सूचना विस्ताराधिकारी प्रेरणा हरबडे यांनी ...

Give students the benefit of scholarship | विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्या

विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्या

परतूर : शासनाच्या शिष्यवृत्तीपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची काळजी मुख्याध्यापकांनी घ्यावी, अशी सूचना विस्ताराधिकारी प्रेरणा हरबडे यांनी दिली. परतूर येथे आयोजित शिष्यवृत्तीबाबतच्या बैठकीत त्यांनी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.

शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. या योजना मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पाेहोचविणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे प्रस्ताव व्यवस्थित भरून ते दिनांक १८ फेब्रुवारीपर्यंत संबंधित कार्यालयात दाखल करावेत. विद्यार्थ्यांना समाजकल्याण व आदिवासी विभागाच्या सर्व शिष्यवृत्तींचा लाभ मिळवून द्यावा. जेणेकरून कोरोना काळात विद्यार्थी व पालकांना आर्थिक मदत होईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे, डी. ए. खरे, प्रकाश ढवळे, स्मिता रोडगे, नेहाल, मुख्याध्यापिका एस. एस. गिरी, ज्योती गाडेकर, संजय शर्मा, वैजनाथ तनपुरे, पी. डी. माने यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षकांची उपस्थिती होती.

फोटो

Web Title: Give students the benefit of scholarship