शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

ऊठ ओबीसी जागा हो... संघर्षाचा धागा हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:58 IST

चौकट वक्त के साथ बदल जाओ... वर्णा... ओबीची मोर्चाच्या सभेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जल्लोषपूर्ण मार्गदर्शन केले. त्यामुळे पाच ...

चौकट

वक्त के साथ बदल जाओ... वर्णा...

ओबीची मोर्चाच्या सभेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जल्लोषपूर्ण मार्गदर्शन केले. त्यामुळे पाच किलोमीटर मोर्चात पायी चालून आल्यावर आलेला थकवा दूर झाला. ऐन हिवाळ्यातही रविवारी कडक ऊन पडल्याने जो-तो सावली शोधत होता. यावेळी मार्गदर्शनात मी येथे आलो असल्याने अनेकांच्या नजरा माझ्याकडे असून काहींचे पोटही दुखणार आहे; परंतु आपण त्याची तमा बाळगत नाही. एवढा मोठा समाज माझ्या सोबत असल्याने मी याची पर्वा करत नसल्याचे सांगून त्यांनी कोणाचेही नाव न घेता विरोधकांना टोला लगावला.

चौकट

जानकर साहेब पाठ मजबूत ठेवा

रविवारी जालन्यात निघालेल्या मोर्चात सर्व पक्षीय नेत्यांचा सहभाग होता. माजी मंत्री आणि धडाडीचे नेते महादेव जानकर हेदेखील यावेळी सभेस हजर हाेते. यावेळी त्याांचा विशेष नामोल्लेख करून मंत्री वडेट्टीवार यांनी जानकर साहेब पाठ मजबूत ठेवा कारण पाठीवरच शाबासकीची थाप अन् खंजीरही खुपसला जातो, असे सांगून नेमकी टिप्पणी केली.

चौकट

तोपर्यंत मी मंत्री राहिलो तर...

ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी आपण अनेक निर्णय घेत आहोत. आजच्या या मोर्चात मी सहभागी झालो आहे. गेल्या वर्षभरात अनेक कल्याणकारी निर्णयही घेतले आहेत; परंतु हे सर्व करत असताना माझे हितशत्रूही काही कमी नाहीत. त्यामुळे समाजाचे आणखी कल्याण करण्यासाठी माझी खूप इच्छा आहे; परंतु तोपर्यंत मी मंत्री राहिलो पाहिजे, असा उपरोधिक टोलाही मंत्री वडेट्टीवार यांनी लगावला. तसेच मी आज मंत्री म्हणून नव्हे तर समाजाचा कार्यकर्ता म्हणून सहभागी झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चौकट

भारतीने दमदार आवाजात मांडल्या मागण्या

मोर्चा संपून ज्याचे जाहीर सभेत रूपांतर झाल्यावर सर्व मान्यवरांच्या सभास्थळी आगमन झाले होते. पायाची शस्त्रक्रिया झाली असतानाही गाडीतून आ. कैलास गोरंट्याल यांनी हजेरी लावली होती. तसेच यावेळी व्यासपीठावरून भारती या युवतीने तिच्या दमदार आणि तेवढ्याच पहाडी आवाजात केंद्र आणि राज्य सरकारकडे असेल्या मागण्यांची यादी वाचून दाखवली. त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.