शहीद जवानावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST2020-12-24T04:27:23+5:302020-12-24T04:27:23+5:30

फोटो आव्हाना (जालना) : पुणे येथे कर्तव्यावर असताना शहीद झालेले जवान गणेश संतोष गावंडे यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी भिवपूर ...

Funeral of a martyred soldier in a state funeral | शहीद जवानावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार

शहीद जवानावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार

फोटो

आव्हाना (जालना) : पुणे येथे कर्तव्यावर असताना शहीद झालेले जवान गणेश संतोष गावंडे यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी भिवपूर (ता. भोकरदन) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासन, प्रशासनाच्या वतीनेही त्यांना मानवंदना देण्यात आली.

भोकरदन तालुक्यातील भिवपूर येथील रहिवासी असलेले गणेश गावंडे (३६) यांची दोन दिवसांपूर्वी श्रीनगर येथून पुणे येथे बदली झाली होती. पुणे येथे सोमवारी सकाळी कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, तीन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी भिवपूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी अंजली कानडे, पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे, उपनिरीक्षक नागरगोजे, जि. प. अध्यक्ष उत्तम वानखेडे यांनी प्रशासनाच्या वतीने मानवंदना दिली. यावेळी विविध क्षेत्रांतील मंडळी, ग्रामस्थांची उपस्थिती होती.

कॅप्शन : भिवपूर येथे शहीद जवानाला सलामी देताना सैन्य दलातील जवान. (२३जेएनपीएच०७)

===Photopath===

231220\23jan_1_23122020_15.jpg

===Caption===

कॅप्शन : भिवपूर येथे शहीद जवानाला सलामी देताना सैन्य दलातील जवान (२३जेएनपीएच०७)

Web Title: Funeral of a martyred soldier in a state funeral