शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

केळना नदीच्या पुलावर चकमक; आरोपी आणि पोलिसांमधील गोळीबाराने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 14:00 IST

परभणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक परराज्यातील एटीएम फोडणाऱ्या टोळीचा पाठलाग करत असताना आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी प्रतिउत्तरात गोळीबार केल्याचे समजते.

- फकिरा देशमुख

भोकरदन : जाफराबाद रोडवरील केळना नदीच्या पुलावर पाठलागा दरम्यान आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर प्रतिउत्तरात एका पोलिस कर्मचाऱ्याने देखील गोळीबार केल्याची घटना बुधवारी ( दि. १६ ) दुपारी १२ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे. दरम्यान, गोळीबार करणारे आरोपी आणि त्यांचा पाठलाग करणारे पोलीस याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. गोळीबारानंतर पोलिसांची जीप एका कारचा पाठलाग करत माहोरा गावाच्या दिशेने सुसाट वेगाने गेल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

16 जून रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान भोकरदन शहरातील जाफराबाद रोडवरील केळना नदीवरील पुलावर वाहतूक ठप्प झाली होती. याच दरम्यान एक कार भरधाव वेगात पुढे आली. पाठोपाठ एक जीपसुध्दा आली. या वाहनांनी पूल ओलांडला तोच एक पोलीस कर्मचारी जीपमधून उतरला आणि त्याने कारच्या दिशेने गोळी झाडली. त्यापूर्वी कारमधील एकाने  पोलिसांच्या दिशेने गोळी झाडल्याची चर्चा आहे. मात्र, उपस्थित नागरिकांना गाडीचे टायर फुटले असेल अशी शंका वाटली. परंतु, पोलिसांच्या गोळीबारामुळे काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच नागरिकांनी धावपळ केली. 

परभणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस ?परभणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक परराज्यातील एटीएम फोडणाऱ्या टोळीचा पाठलाग करत असताना आरोपींनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केल्यानंतर पोलिसांनी प्रतिउत्तरात गोळीबार केल्याचे समजते. याशिवाय यातील काही आरोपी भोकरदन येथे गाडीतून उतरल्याची चर्चा आहे. याबाबत भोकरदनच्या पोलिस निरीक्षक शालिनी नाईक यांनी सांगितले की, नेमके प्रकरण काय आहे हे सांगता येणार नाही. मात्र, जिंतूर येथील परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी डॉ. श्रवण दत्त यांनी संबंधित पोलिसांना मदत करण्याचा फोन केला होता. याबाबत लोकमत प्रतिनिधीने श्रवण दत्त यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संपूर्ण माहिती हाती आल्यानंतर याबद्दल सांगता येईल अशी प्रतिक्रिया दिली.  

टॅग्स :PoliceपोलिसFiringगोळीबारJalanaजालना