शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

पाझर तलावात बुडून पाच मुलींचा मृत्यू; आंघोळीला गेल्या, पण खड्ड्याने घात केला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:24 IST

मृत्युमुखी पडलेल्या पाचही मुली आपसात नातेवाईक असून ८ ते १२ वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

भोकरदन : तालुक्यातील तळेगाववाडी येथील पाझर तलावात आंघोळीसाठी गेलेल्या पाच मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. मृत्युमुखी पडलेल्या पाचही मुली आपसात नातेवाईक असून ८ ते १२ वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

तळेगाववाडी येथील पाझर तलावाच्याजवळ काही नागरिकांची वस्ती आहे. आज दुपारी येथील सहा मुली पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुतल्यानंतर सहाही मुली वस्तीवर येऊन अंघोळीसाठी परत तलावावर गेल्या. पाण्यात उतरल्यानंतर त्यातील एक मुलगी तलावातील खड्ड्यात बुडाली. तिला वाचविण्यासाठी दुसरीने प्रयत्न केला असता ती सुद्धा बुडाली. दोघी बुडत असल्याचे दिसताच इतर तिघींनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाचही मुली त्यात बुडाल्या. यावेळी सहाव्या मुलीने लागलीच वस्तीवर धाव घेत तेथील नागरिकांना सर्व हकीकत सांगितली. नागरिकांनी लागलीच तलावाकडे धाव घेतली.

पाचही मुलींना अत्यवस्थ अवस्थेत तलावाच्या बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी तत्काळ फुलंब्री येथील रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. मात्र, वाटेतच पाचही मुलींचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. या घटनेने तळेगाव वाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

अर्शान लतीफ पठाण ( १२ ), अल्फिया गौफखा पठाण ( १० ), शबाना असलम पठाण ( ८ ), सादिया असलं पठाण (१० ), नाझिया नवाज पठाण ( ८ ) अशी मृत मुलींची नावे आहेत. तर नाझिया असेफ पठाण ( ८ ) ही मुलगी बचावली आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूdrowningपाण्यात बुडणेJalanaजालना