शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:32 IST

केदारखेडा : थकीत वीज बिलाच्या पोटी महावितरण कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाण्याअभावी रब्बीतील पिकांचे होणारे नुकसान पाहून ...

केदारखेडा : थकीत वीज बिलाच्या पोटी महावितरण कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पाण्याअभावी रब्बीतील पिकांचे होणारे नुकसान पाहून शेतकरी पुत्रांनी सोमवारी महावितरणच्या भोकरदन येथील उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार करीत दोन दिवसांत वीजपुरवठा पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.

आंदोलकांनी उपकार्यकारी अभियंता दीपक तुरे यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे पिकांना पाणी देता येत नाही. पाण्याअभावी पिके सुकू लागली आहेत. याचा फटका रब्बीतील गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा या पिकांना बसत आहे. तसेच जनावरांना पाणी पाजण्यासाठी पशुपालकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे खंडित केलेला विद्युत पुरवठा दोन दिवसांत सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास १८ फेब्रुवारी रोजी महावितरण कार्यालयात रुमणे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर नारायण लोखंडे, विकास जाधव, सिरसगाव मंडपचे सरपंच सूरज सहाणे, बरंजळा साबळेचे सरपंच नारायण साबळे, प्रदीप शिंदे, संदीप भोकरे, अजहर शेख, रवींद्र मोरे, अनिल साबळे, आप्पासाहेब जाधव, अजिनाथ सहाणे, प्रदीप लोखंडे, तुळशीराम साबळे, जगदीश सहाणे, आप्पासाहेब सहाणे, बाबासाहेब शिरसाट, गणेश लोखंडे, आदींच्या सह्या आहेत.

घोषणांनी दणाणला परिसर

यावेळी आंदोलकांनी दिवसा वीज द्या, आमचं जगणं मान्य करा, जय जवान-जय किसान, खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करा, अशा घोषणा दिल्या. युवकांनी दिलेल्या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

कोट

निवडणूक आली की सर्वच राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांना वीज बिल माफीची आश्वासने दिली जातात. त्यामुळे शेतकरी संभ्रमात सापडतो. त्यात कधी अतिवृष्टीमुळे, तर कधी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी देशोधडीला लागत आहेत. त्यात कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे तत्काळ वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा नारायण लोखंडे यांनी यावेळी दिला.

फोटो