शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

अंतरवाली सराटीत 'एकच पर्व, ओबीसी सर्व'; लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारेंचे जल्लोषात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 19:07 IST

मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भेट

- पवन पवार वडीगोद्री ( जालना) : ओबीसी नेते प्रा. लक्ष्मणराव हाके, नवनाथ वाघमारे हे रविवार ता.07 रोजी वडीगोद्री येथे आले आसता त्यांनी अंतरवाली सराटी येथे सदिच्छा भेट दिली. मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीत ओबीसी नेते हाके व वाघमारेच जल्लोषात स्वागत करण्यात आले. एकच पर्व ओबीसी सर्व, हाके साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यादरम्यान ओबीसी  नेते हाके व वाघमारे यांचे महिलां व विद्यार्थीकडून औक्षण करण्यात आले.

प्रा.हाके आणि वाघमारे यांनी ग्रामस्थांच्या जोरदार स्वागतानअंतर गावात ठिकठिकाणी भेट देत ग्रामस्थांसोबत संवाद साधला. गावातील पढाई मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, श्रीकृष्ण मंदिर आदी ठिकाणी जाऊन दर्शन घेतले. गावातील नागरीकांनी फेरीमध्ये सहभाग घेतला. नुकतेच वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचाव करीता प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी उपोषण केले होते या वेळी अंतरवाली सराटी येथील ओबीसी समाज बांधवांनी मोठा सहभाग या ठिकाणी नोंदवला होता. याबद्दल प्रा.हाके, वाघमारे यांनी समाज बांधवाचे आभार व्यक्त केले. विद्यार्थी, युवक यांच्यासोबत अनेक विषयावर चर्चा केली. एकूणच लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी बांधवांची भेट घेऊन संवाद साधल्याने अंतरवाली सराटीमधील ओबीसी बांधवात मोठा उत्साह पाहायला मिळाला.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीlaxman hakeलक्ष्मण हाकेJalanaजालनाOBC Reservationओबीसी आरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षण