शिक्षकांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:27 IST2021-01-22T04:27:47+5:302021-01-22T04:27:47+5:30

मुलींना स्वसंरक्षण कीटचे वाटप जालना : भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस तथा नगरसेविका संध्या देठे यांच्यावतीने प्रभाग ...

Discussion on various topics in teacher meetings | शिक्षकांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

शिक्षकांच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

मुलींना स्वसंरक्षण कीटचे वाटप

जालना : भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस तथा नगरसेविका संध्या देठे यांच्यावतीने प्रभाग क्रमांक २३ मधील मुलींसाठी स्वसंरक्षण शिबिर घेण्यात आले. शिबिरात सहभागी मुलींना स्वसंरक्षण कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक दत्ता पवार, ज्योती पवार, निवृत्ती दिघे यांच्यासह परिसरातील महिला, नागरिकांची उपस्थिती होती.

विजेत्या विद्यार्थिनींना पारितोषिकांचे वाटप

परतूर : जागतिक एड्स दिनानिमित्त एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्राच्यावतीने घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेत विवेकानंद हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी यश संपादित केले आहे. तनुजा कदम, वैष्णवी वाशिंबे, दीक्षा दीक्षित यांचा यात समावेश आहे. विजेत्या मुलींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वाटप करण्यात आले. यावेळी अधीक्षक डॉ. डी. आर. नवल, डॉ. जाहेद सय्यद, डॉ. महादेव उनवणे आदींची उपस्थिती होती.

भिवपूर येथील सप्ताहाची सांगता

भोकरदन : तालुक्यातील श्री स्वामी समर्थ आत्मानंद महाराज संस्थान मंगळवेढा भिवपूर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची शोभायात्रेने सांगता करण्यात आली. अनिल महाराज तुपे यांनी श्रीराम कथा श्रवण केले. सप्ताहात विविध सामाजिक उपक्रम राबिवण्यात आले. मंगळवारी तुपे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले.

Web Title: Discussion on various topics in teacher meetings