तळेगावच्या शाळेत साकारतोय ‘डेन्स फाॅरेस्ट’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:59 IST2021-02-05T07:59:04+5:302021-02-05T07:59:04+5:30

राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील जि.प.प्राथमिक शाळेमध्ये डेन्स फाॅरेस्ट हा उपक्रम राबविला जात असून, शाळा परिसरात वृक्षलागवड ...

'Dens Forest' initiative is being implemented in a school in Talegaon | तळेगावच्या शाळेत साकारतोय ‘डेन्स फाॅरेस्ट’ उपक्रम

तळेगावच्या शाळेत साकारतोय ‘डेन्स फाॅरेस्ट’ उपक्रम

राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील जि.प.प्राथमिक शाळेमध्ये डेन्स फाॅरेस्ट हा उपक्रम राबविला जात असून, शाळा परिसरात वृक्षलागवड करण्यात आलेली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांच्या संकल्पनेतून डेन्स फाॅरेस्ट हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात प्रत्येक केंद्रातील एका शाळेची निवड करण्यात आली आहे. राणी उंचेगाव केंद्रांतर्गत असलेल्या तळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. डेन्स फाॅरेस्ट या उपक्रमांतर्गत शाळा परिसरात लिंब, पिंपळ, वड अशा विविध जातींच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. यात १०० वृक्षांची लागवड करण्यात आली असून, त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी ही शिक्षकांवर देण्यात आली आहे. कमीत-कमी जागेत जास्त काळ टिकणारी झाडे यात लावण्यात आली असल्याचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र जोशी यांनी सांगितले. यासाठी केंद्रप्रमुख राजेश सदावर्ते, मुख्याध्यापिका अनुसया मंचाळ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानाभाऊ वायाळ, नवनाथ बेद्रे आदींची उपस्थिती होती.

Web Title: 'Dens Forest' initiative is being implemented in a school in Talegaon