कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:57 IST2021-03-04T04:57:55+5:302021-03-04T04:57:55+5:30

शेतीच्या वादातून एकास मारहाण जालना : शेतीच्या वादातून एकास पाच जणांनी मारहाण केल्याची घटना अंबड तालुक्यातील वडीकाळा येथे २८ ...

Demand for withdrawal of suspension of employees | कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी

कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेण्याची मागणी

शेतीच्या वादातून एकास मारहाण

जालना : शेतीच्या वादातून एकास पाच जणांनी मारहाण केल्याची घटना अंबड तालुक्यातील वडीकाळा येथे २८ फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकरणी डिगांबर अर्जुन मुसळे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बाबासाहेब गोपीनाथ मोताळे, अप्पासाहेब बाबासाहेब मोताळे, अंगद बाबासाहेब मोताळे, गणेश पूर्ण नाव माहीत नाही, काशीनाथ मोताळे (सर्व रा. वडीकाळा ता. अंबड) यांच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पीएसआय कौळासे हे करीत आहेत.

गुटखा विक्री करणारा अटकेत

जालना : बेकायदेशीरित्या जाफराबाद ते टेंभुर्णी रोडवरील नळविहरा फाटा येथे गुटखा विक्री करणाऱ्यास अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मंग‌ळवारी पकडले. शेख अक्रम शेख (२७, रा. जाफराबाद) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संजय नामदेव वट्टे यांच्या फिर्यादीवरून शेख अक्रम शेख युसूफ याच्याविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

.....अखेर लाचप्रकरणी गुन्हा दाखल

जालना : कृषिपंपाचे कोटेशन मंजूर करण्यासाठी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञान राजू नारायण घाडगे याला ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने पकडले होते. याप्रकरणी मंगळवारी तक्रारदाराच्या फिर्यादीवरून राजू घाडगे याच्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोनि. एस.एस. ताटे हे करीत आहेत.

Web Title: Demand for withdrawal of suspension of employees