मच्छिमार संस्थेची संरक्षण देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST2021-02-06T04:55:16+5:302021-02-06T04:55:16+5:30

मच्छिमार संस्थाध्यक्ष लिंबुरे यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही शासनाकडून तलावाचा ठेका घेतलेला आहे. परंतु पाडळी येथील काही लोक जाणून बुजून त्रास ...

Demand for protection of fishermen's organization | मच्छिमार संस्थेची संरक्षण देण्याची मागणी

मच्छिमार संस्थेची संरक्षण देण्याची मागणी

मच्छिमार संस्थाध्यक्ष लिंबुरे यांच्या म्हणण्यानुसार, आम्ही शासनाकडून तलावाचा ठेका घेतलेला आहे. परंतु पाडळी येथील काही लोक जाणून बुजून त्रास देत आहेत, पाडळी हे गाव या तलावाच्या परिसरातील आहे. येथील १० ते १२ लोक सूचना देऊन देखील पकडलेल्या माशांचे ठेकेदारांना पैसे न देता काठ्या, कुऱ्हाडी घेऊन मारायला येतात व मासे घेऊन जातात. त्यामुळे ठेकेदारांना मानसिक त्रास देऊन आर्थिक झळ पोहोचवित असल्याचे निवृत्ती लिंबुरे यांनी निवेदनात म्हटले आहे.

मंठा ठाणे घेत नाही दखल

मंठा तालुक्यात येणाऱ्या गावांमध्येही काही लोक ठेकेदाराला त्रास देतात, मंठा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी दिल्या, परंतु पोलीस निरीक्षक निकम हे तक्रारीची दाखल घेत नसल्याने निवृत्ती लिंबुरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

Web Title: Demand for protection of fishermen's organization