शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

राजूर येथील ४८ अतिक्रमणे हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 00:55 IST

गुरूवारी ४८ अतिक्रमणांवर हातोडा मारण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कराजूर : येथील ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटविण्याबाबत दिलेली मुदत संपल्यानंतर गुरूवारी ४८ अतिक्रमणांवर हातोडा मारण्यात आला. पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.श्री क्षेत्र राजूर येथील राजुरेश्वर मंदिर परिसर विकास कामांसाठी २५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या निधीतून विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात व्यापारी संकुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. मंदिर परिसरातील गट नं. १५४ मधील गायरान जमिनीवरील जागेवर अनेक वर्षांपासून दुकानदारांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटलेला आहे. अतिक्रमीत जागेवर रस्त्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.त्यामुळे अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटविणे गरजेचे होते. त्यानुसार तहसीलदार संतोष गोरड यांनी ग्रामपंचायतीला पत्र देत संबंधित अतीक्रमण हटविण्याबाबत सूचित केले होते. ग्रामपंचायतीने ४८ अतिक्रमणधारकांना नोटिसा देऊन १९ नोव्हेंबरची मुदत दिली होती. मात्र, नोटिसीची दखल व्यावसायिकांनी घेतली नव्हती. त्यामुळे प्रशासनाने गुरूवारी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमणे हटविली. यावेळी काहींनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अनेक दुकाने जेसीबीच्या सहाय्याने हटविण्यात आली. त्यामुळे मंदिराकडे जाणा-या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.यावेळी नायब तहसीलदार विश्वास धर्माधिकारी, सहायक पोलीस निरीक्षक एम.एन.शेळके, मंडळाधिकारी पी.जे.काळे, तलाठी अण्णासाहेब कड, शंकर काटकर, शिवाजी देशमुख, राजू उनगे, पवन सुंदर्डे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणcivic issueनागरी समस्याgram panchayatग्राम पंचायत