जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्यांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:58 IST2021-03-04T04:58:08+5:302021-03-04T04:58:08+5:30

रोटरी क्लबच्यावतीने श्रवण यंत्राचे वाटप जालना : येथील रोटरी क्लब ऑफ जालनाच्यावतीने खामखेडा येथील गरजू मुलाला श्रवणयंत्राचे वाटप करण्यात ...

Dedication of classrooms in Zilla Parishad schools | जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्यांचे लोकार्पण

जिल्हा परिषद शाळेतील वर्ग खोल्यांचे लोकार्पण

रोटरी क्लबच्यावतीने श्रवण यंत्राचे वाटप

जालना : येथील रोटरी क्लब ऑफ जालनाच्यावतीने खामखेडा येथील गरजू मुलाला श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. संदीप अग्रवाल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वाढणारे कर्णबधिरतेचे प्रमाण आणि त्याबाबत घ्यावयाची दक्षता याची माहिती डॉ. अग्रवाल यांनी यावेळी दिली. कार्यक्रमास रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

दीपक महाराज जोशी, जऱ्हाड यांचा सत्कार

बदनापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मराठी भाषेचा प्रचार, प्रसार करणारे दीपक महाराज जोशी, शेतकरी दामोधर जऱ्हाड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष गजानन गिते, कैलास खेडके, बाबासाहेब सुडके, कैलास नरोडे, सचिन आगळे, शेख मस्तान, अंकुश शिर्के, मनोज जऱ्हाड, कय्यूम बेग मिर्झा, विनोद बोरसे, सचिन पाटील आदींची उपस्थिती होती.

Web Title: Dedication of classrooms in Zilla Parishad schools