शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाकाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:19 IST

जिल्ह्याची स्थिती : कोरोनातील सूचनांचे पालन करून विल्हेवाट जालना : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमधून कोरोनातील नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८१ ...

जिल्ह्याची स्थिती : कोरोनातील सूचनांचे पालन करून विल्हेवाट

जालना : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमधून कोरोनातील नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ८१ टन जैविक कचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. कोरोनापूर्वी वार्षिक सरासरी २० ते २४ टन कचऱ्याचे संकलन होत होते. मात्र, कोरोनातील नऊ महिन्यांच्या कालावधीतच ८१ टन म्हणजे तीन- साडेतीन वर्षाचा कचरा संकलित झाला आहे.

शासकीय रुग्णालये असो अथवा खासगी रुग्णालये असोत, या रुग्णालयातील कचरा घनकचऱ्याप्रमाणे कोठेही टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. विशेषत: कोरोनाच्या कालावधीतील संक्रमण पाहता या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लागावी, याबाबत आरोग्य विभागाच्या वतीने वेळोवेळी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कचऱ्याचे संकलन करण्यासाठी नियुक्त केलेल्या सहा वाहनांद्वारे कचऱ्याचे संकलन करण्यात आले आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभी दोन टन कचरा संकलित झाला होता. नंतर मात्र, जुलै ते डिसेंबर या कालावधीत सरासरी १० ते ११ टन कचऱ्याचे संकलन झाले आहे. विशेष म्हणजे कोरोनापूर्वी मासिक दोन टन आणि वार्षिक सरासरी २० ते २४ टन कचऱ्याचे संकलन होत होते.

जैविक कचरा फेकणाऱ्यांना दंड

जैविक कचरा कोठेही टाकल्याचे निदर्शनास आल्यानंतर रुग्णालय बंद करण्याच्या नोटिसा देऊन सुनावणी घेतली जाते. सुनावणीनंतरही कोणी कचरा विल्हेवाट नियमांचे उल्लंघन केले तर त्या आस्थापनेवर कायदेशीर कारवाई केली जाते. कोरोना काळात अशी एकही कारवाई झालेली नाही.

साडेतीन वर्षांचा कचरा

नऊ महिन्यात संकलित

यापूर्वी जिल्ह्यात वार्षिक केवळ २० ते २४ टन जैविक कचरा संकलित होत होता. मात्र, कोरोनामुळे सलाईन, इंजेक्शन, कीट यासह इतर साहित्याचा, साधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. त्यामुळे कोरोनातील नऊ महिन्यांच्या काळातच तीन ते साडेतीन वर्षात संकलित होण्याइतका कचरा संकलित झाला आहे.

शासकीय, खासगी रुग्णालयांमधील कचऱ्याची नियमानुसार विल्हेवाट लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या कालावधीत सर्वच रुग्णालयांनी या सूचनांचे पालन केले आहे.

- डॉ. विवेक खतगावकर,

जिल्हा आरोग्य अधिकारी