शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:24 IST

जालना : पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाढलेल्या दराविरोधात जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी सायकल रॅली काढून दरवाढीचा ...

जालना : पेट्रोल, डिझेलसह जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाढलेल्या दराविरोधात जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी सायकल रॅली काढून दरवाढीचा निषेध करण्यात आला.

गेल्या दीड वर्षापासून देशातील जनता कोरोनामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेली आहे. अनेकांचे रोजगार गेले असून, हाताला काम नसल्यामुळे सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रातील भाजप सरकारने जीवनावश्‍यक वस्तूंचे दर आटोक्यात ठेवणे गरजेचे आहे. परंतु, केंद्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांमध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, इंधनाचे दर वाढल्यामुळे त्याचा परिणाम जीवनावश्‍यक वस्तूंच्या दरवाढीवर झाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांनी दरवाढीच्या निषेधार्थ राज्यभर आंदोलन करण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शुक्रवारी सकाळी शहरातील हुतात्मा जनार्धनमामा यांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून सायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली महावीर चौक, सुभाष चौक, मुथा बिल्डिंग, लोखंडी पूल, मस्तगडमार्गे गांधी चमन येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, आर. आर. खडके, प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे, प्रा. सत्संग मुंढे, विजय कामड, प्रभाकर पवार, गटनेते गणेश राऊत, राम सावंत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, त्रिंबक पाबळे, विठ्ठलसिंग राजपूत, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा विमल आगलावे, बदर चाऊस, दिनकर घेवंदे, आनंद लोखंडे, शेख शमशू, सय्यद निजाम आदींची उपस्थिती होती.