शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

मृत जलसाठ्यावर नागरिकांची मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:41 IST

भोकरदन अर्ध्या तालुक्याची व विदर्भातील काही ग्रामस्थांची तहान भागविण्याऱ्या पद्मावती धरणात केवळ दीड महिना पुरेल, एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवालसावंगी : भोकरदन अर्ध्या तालुक्याची व विदर्भातील काही ग्रामस्थांची तहान भागविण्याऱ्या पद्मावती धरणात केवळ दीड महिना पुरेल, एवढाच जलसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे ग्रामस्थांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.उत्तर भोकरदन परिसरातील सर्व लहान- मोठी धरणे सध्या आटली आहेत. केवळ पद्मावती धरणातच मृतजलसाठा शिल्लक राहिला आहे.दुष्काळामुळे सध्या सर्वत्र पाणी टंचाईचे चटके नागरिकांना सहन करावे लागत आहे. सर्व जलस्त्रोत आटले असल्याने टँकरवर नागरिकांची तहान भागविण्यासाठी पद्मावती धरणाच्या परिसरात विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत.यावरून दररोज ५० टँकरद्वारे भोकरदन तालुक्यातील धावडा, सुंदरवाडी, पिंपळगाव रेणुकाई, जळगाव सपकाळ, अवघडराव सावंगी, आन्वा, वालसावंगी आदी व बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव, तराडखेड, कुम्मणी, देवूळघाट यासह अनेक गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, धरणातील पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत चालली आहे. यामुळे धरणात केवळ दीड महिना टिकेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.याबाबत सरपंच रंजना आहेर म्हणाल्या, सद्य स्थितीत गावातील नागरिकांना वेळेवर पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु, येणाऱ्या काळ कठीण जाण्याची शक्यता असून, पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती होऊ नये, यासाठी उपाय- योजना करणे सुरू आहे. तसेच परिसरात रस्त्यांची मोठ्या प्रमणात कामे सुरू आहेत. यामुळे रस्त्यावर पाणी मारण्यासाठी देखील येथूनच टँकर भरून नेले जात आहेत.१० विहिरी अधिग्रहण, सात टँकर सुरूपरतूर : तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई तीव्र होऊ लागली असून, आता पर्यंत १९ विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत, तर ७ टँकर सुरू करण्यात आले आहेत.तालुक्यात उन्हाच्या तीव्रतेबरोबरच पाणी टंचाईचे चित्र गडद होऊ लागले आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने विहिरी, बोअर, तलाव कोरडे पडत आहेत. एप्रिल मध्ये होणारी पाणी टंचाई यावर्षी फेब्रुवारी च्या सुरुवातीपासूनच जाणवू लागली आहे. विहीर अधिग्रहण व टँकरसाठी प्रस्ताव येऊ लागले आहेत. काही गावाला तर टँकरसाठी उपोषणही करावे लागत आहे.सुरूमगावला उपोषणा नंतरच टँकर सुरू करण्यात आले. सद्या तालुक्यात ७ गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. टँकरसाठी ११ प्रस्ताव आले आहेत. यापैकी लिखित पिंप्री, परतवाडी, ढोकमाळ तांडा, कºहाळा, खांडवी वाडी, सुरूमगाव या सहा गावांना टँकर सुरू आहे. तर शेवगा या गावाला वर्षभर टँकरने पाणी सुरू आहे. या गावातील पाणी घातक क्षार युक्त असल्याने ते पिण्यास योग्य नाही. तर विहीर अधिग्रहणासाठी एकूण २६ प्रस्ताव आले आहेत.यापैकी १९ प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ