पाठलाग करून दुचाकी चोरट्यांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:56 IST2021-02-06T04:56:02+5:302021-02-06T04:56:02+5:30

सदर बाजार पोलिसांची कारवाई; सहा दुचाकी जप्त जालना : शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरणाऱ्यांचा पाठलाग करून सदर बाजार पोलिसांनी ...

Chased and caught the bike thieves | पाठलाग करून दुचाकी चोरट्यांना पकडले

पाठलाग करून दुचाकी चोरट्यांना पकडले

सदर बाजार पोलिसांची कारवाई; सहा दुचाकी जप्त

जालना : शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरणाऱ्यांचा पाठलाग करून सदर बाजार पोलिसांनी गुरुवारी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सहा दुचाकी असा एक लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशोक भिकाजी तरकसे (वय २०, रा. कन्हैयानगर जालना), आकाश रावसाहेब देवकर (३०, रा. लालबाग) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

गणेश घोगरे यांनी घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरून नेल्याची तक्रार सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना शहरातील स्वामी विवेकानंद हॉस्पिटल रोडने अशोक तरकसे व आकाश देवकर हे जाताना दिसले. त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, सदर गुन्हेगारांनी जोराने दुचाकी चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांना दुचाकीबाबत विचारपूस केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या दुचाकीची पाहणी केली असता, चोरीस गेलेल्या दुचाकी असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी शहरातील विविध भागात लपवून ठेवलेल्या दुचाकी जप्त केल्या. त्यांच्याकडून एक लाख ४५ हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या.

ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय देशमुख, पोलीस उपनिरीक्षक रमेश रूपेकर, हवालदार रामप्रसाद रंगे, धनाजी कावळे, सोमनाथ उबाळे, पोलीस कॉन्स्टेबल सुधीर वाघमारे, स्वप्निल साठेवाड, सोपान क्षीरसागर, योगेश पठाडे, पोलीस नाईक समाधान तेलंग्रे, फुलचंद गव्हाणे, चालक ओव्हाळ, संतोष खरात, सुमित्रा अंभोरे, आदींनी केली.

Web Title: Chased and caught the bike thieves