महत्त्वाच्या बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:25 IST2020-12-25T04:25:07+5:302020-12-25T04:25:07+5:30

साने गुरुजी जयंतीनिमित्त चित्रकला, निबंध स्पर्धा जालना : कै. बाबूराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त चित्रकला व निबंध ...

Breaking News | महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

साने गुरुजी जयंतीनिमित्त चित्रकला, निबंध स्पर्धा

जालना : कै. बाबूराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयात साने गुरुजी जयंतीनिमित्त चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याध्यापिका मीनाक्षी कुलकर्णी यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षक संदीप इंगोले, भीमाशंकर जवळेकर, अलकनंदा गाडेकर, प्रगती भालेकर, संपदा काटे आदींची उपस्थिती होती.

-------------

गोंदी येथे दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

गोंदी : अंबड तालुक्यातील गोंदी येथे दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारपासून येथील दत्त धाम येथे कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. २३ ते २८ डिसेंबरपर्यंत प्रवचन, श्रीगुरुचरित्र पारायण, श्रीमद्भागवतकथा, श्रीविष्णुसहस्रनाम, गीतापाठ व कीर्तन आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात बोगिराज मुळे, भरत रामदासी, सुहास रामदासी, मगेश महाराज हिवरेकर, गणेश रामदासी, अच्युत मुळे, दिनेश डोळे, संतोष मिरकड, गणेश डोळ, गणेश डोरले आदींचे कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: Breaking News