महत्वाच्या बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:17 IST2020-12-28T04:17:19+5:302020-12-28T04:17:19+5:30

नाताळनिमित्त गोरगरीब महिलांना साड्या वाटप जालना : येथील गॉडस जीजस लॅम्ब क्राईस्ट चर्चच्या वतीने नाताळनिमित्त तृतीयपंथी, गोरगरीब महिलांना ...

Breaking News | महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

नाताळनिमित्त गोरगरीब महिलांना साड्या वाटप

जालना : येथील गॉडस जीजस लॅम्ब क्राईस्ट चर्चच्या वतीने नाताळनिमित्त तृतीयपंथी, गोरगरीब महिलांना साड्या वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगन्नाथ गौडा, कारागृह निरीक्षक पाटील, डॉ. सतीश मोरे, प्रदीप अभ्यंकर, पास्टर अब्राहम घुमारे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेविड घुमारे, ख्रिश्चन ब्रिगेडचे अध्यक्ष रविकांत दानम, वीरेंद्र गायकवाड, डॉ. प्रतीक गायकवाड, फिलिप पाटोळे, जॉन पिल्ले, चांगदेव भाकरे आदींची उपस्थिती होती.

फोटो

वकील आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी अ‍ॅड. दिनेश खरात

जालना : बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वकील आघाडी जिल्हाध्यक्षपदी दिनेश खरात यांची नियुक्ती करण्यात आली. रविवारी जालना शहरात झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष मिलिंद बोर्डे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने, जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल मोसिन पटेल, जिल्हा महासचिव राखसिंग जुनी, युवक जिल्हाध्यक्ष निकेतन बोर्डे, युवक शहराध्यक्ष विल्सन वाघमारे, रवी वाडेकर, सुमित सपकाळ, शेख शफी शेख मिया, शेख सोहेल, विशाल चव्हाण, सुरेश पवार आदींची उपस्थिती होती.

Web Title: Breaking News