लोकमत न्यूज नेटवर्कटेंभुर्णी : जाफराबाद तालुक्यातील डोलखेडा खुर्द येथील माणिक विक्रम डोईफोडे (४२) यांचा पूर्णा नदीच्या बॅकवॉटरमध्ये पडल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली.जाफराबाद तालुक्यातील डोलखेडा खुर्द येथील माणिक विक्रम डोईफोडे यांंचा मृतदेह सोमवारी दुपारी येथील गट क्र. १९१ मधील पूर्णा नदी बॅकवाटरमध्ये तरंगताना काही लोकांना सोमवारी दुपारी दिसून आला. या घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.घटनास्थळावरील मृतदेह कुजून त्याची दुर्गंधी सुटली होती. त्यामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू हा तीन ते चार दिवसांपूर्वी घडल्याचा अंदाज टेंभुर्णी पोलिसांनी वर्तविला आहे. घटनास्थळीच पार्थिवाचे शवविच्छेदन माहोरा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वानखेडे यांनी केले. शवविच्छेदनानंतर पार्थिव मयतांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर मयताच्या पार्थिवावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत माणिक डोईफोडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.घटनास्थळाला फौजदार ज्ञानेश्वर साखळे, बीट जमादार मोहिते, पोकॉ. महेश वैद्य, सानप, धोंडगे यांनी देऊन पाहणी केली. तपास बीट जमादार पंडित गवळी करीत आहेत.
पूर्णा नदीच्या बॅक वॉटरमध्ये मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 01:10 IST