शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये ८५ दात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST

बायपासवरील पुलाचे काम संथ गतीने सुरू जालना : शहरातील भोकरदन चौफुलीवरील नवीन मोंढा ते औरंगाबाद बायपास रस्त्यालगत समांतर पुलाचे ...

बायपासवरील पुलाचे काम संथ गतीने सुरू

जालना : शहरातील भोकरदन चौफुलीवरील नवीन मोंढा ते औरंगाबाद बायपास रस्त्यालगत समांतर पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम संथ गतीने सुरू असून, राजूरकडे जाणाऱ्या वाहन चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देवून या पुलाचे काम वेळेत पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

शेंडगे विद्यालयामध्ये अभिवादन कार्यक्रम

जालना : शहरातील शिवाजीराव शेंडगे महाविद्यालयात संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक बालासाहेब आबुज, अर्जुन पवार, कांतराव रांजनकर, डॉ. विठ्ठल पावले यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास राहुल मुंडे, राजू साळवे, बालाजी भिसे आदींची उपस्थिती होती.

मंठा शहरामधील दिगंबर रंगारी यांचे यश

मंठा : शहरातील रेणुका कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. दिगंबर देवाजी रंगारी यांना नुकताच मानसशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शोधप्रबंध सादर केला होता. या यशाबद्दल त्यांचे स्वागत होत आहे.

चापनेर येथील व्याख्यानास प्रतिसाद

जाफराबाद : तालुक्यातील चापनेर येथे आयोजित व्याख्यान कार्यक्रमात अक्षय लोखंडे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. मराठा समाजातील युवकांनी व्यवसायाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शिवाजी पवार, बालाजी पवार, दिनेश लक्कस, विकास लोखंडे, सरपंच राजेश म्हस्के, विजय तबदे, प्रा. मंगेश लोखंडे, प्रा. योगेश लोखंडे आदींची उपस्थिती होती.