मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 21:53 IST2025-10-29T21:53:00+5:302025-10-29T21:53:52+5:30
Manoj Jarange Patil Bacchu Kadu Morcha: बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये वर्धा रोडवर आंदोलन सुरू असून, या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील रवाना झाले आहेत.

मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
वडीगोद्री ( जालना ): मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील बच्चू कडूंना समर्थन देण्यासाठी नागपूरला रवाना झाले असून मनोज जरांगे पाटील हे बच्चू कडू यांच्या आंदोलनात सहभागी होणार आहे.
अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील निवासस्थानाहून मनोज जरांगे पाटील नागपूरच्या दिशेने रवाना झाले आहेत.
मनोज जरांगे रवाना होण्यापूर्वी काय बोलले?
"तिथल्या आंदोलकांना त्रास होतोय, शेतकरी सगळा नागपूरला बसला आहे ज्यावेळेस अटीतटीची वेळ असती, त्यावेळेस आपण शेतकऱ्यांसाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे.खंबीरपणाने शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहिला पाहिजे म्हणून तातडीने आम्ही नागपूरकडे निघालो आहे, असे जरांगे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांसोबत आंदोलकांची मंत्रालयात बैठक
दरम्यान, आंदोलकांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने चर्चा करण्यासाठी येण्याचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव बच्चू कडू, अजित नवले, राजू शेट्टी यांच्यासह शेतकरी नेत्यांनी स्वीकारला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आंदोलनाचे नेते मुंबईला जाणार आहेत. गुरूवारी, २९ ऑक्टोबर रोजी मंत्रालयात बैठक होणार असून, त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे.