श्री बालाजी महाराज संस्थानतर्फे दोन लाख अकरा हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST2021-02-07T04:28:56+5:302021-02-07T04:28:56+5:30

देऊळगाव राजा : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणाकरिता येथील श्री बालाजी महाराज संस्थानने दोन लाख अकरा हजारांचा निधी ...

Assistance of two lakh eleven thousand from Shri Balaji Maharaj Sansthan | श्री बालाजी महाराज संस्थानतर्फे दोन लाख अकरा हजारांची मदत

श्री बालाजी महाराज संस्थानतर्फे दोन लाख अकरा हजारांची मदत

देऊळगाव राजा : अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणाकरिता येथील श्री बालाजी महाराज संस्थानने दोन लाख अकरा हजारांचा निधी दिला आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे देशभरातून निधी गोळा केला जात आहे.

श्री बालाजी महाराज संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त विजयसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमी सामाजिक उपक्रम राबविले जातात. सध्या अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासातर्फे देशभरातून निधी संकलित केला जात आहे. यासाठी श्री बालाजी महाराज संस्थानच्यावतीने दोन लाख अकरा हजार रुपयांचा धनादेश विजयसिंह जाधव यांच्याहस्ते देण्यात आला. नागरिकांनी निधी संकलनासाठी सहकार्य करावे, असे आवाहन विजयसिंह जाधव यांनी केले आहे. यावेळी निधी संकलन अभियान समितीचे संयोजक शुभम देवउपाध्ये, नगर संघचालक पुरुषोत्तम धन्नावत, प्रमोद धाराशिवकर, बिपीन मल्लावत, दीपक मल्लावत, दीपक खेते, सूरज गुप्ता, राजाभाऊ पुजारी, श्रीपाद गोंदकर, वसंत कुलकर्णी, रामभाऊ कुंभारीकर, गोविंद देव, विनायक टोणपे, उदय पुजारी, रावसाहेब पुजारी, चंद्रकांत पुजारी, अरविंद पुजारी, दिलीप पुजारी, सुरेशअप्पा दीडहाते, पी. बी. जाधव, अंकुश सावजी, अ‍ॅड. भाला, संस्थानचे व्यवस्थापक किशोर बिडकर, आशिष वैद्य, डॉ. किरण मोगरकर, मंगेश जगदाळे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Assistance of two lakh eleven thousand from Shri Balaji Maharaj Sansthan