वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:58 IST2021-03-04T04:58:13+5:302021-03-04T04:58:13+5:30

कारवाईची मागणी परतूर : शहरासह ग्रामीण भागात अवैध धंदे जोमात सुरू आहेत. दारूविक्री, मटका, जुगार, गुटखा विक्री आदी अवैध ...

Appeal to obey traffic rules | वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन

वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन

कारवाईची मागणी

परतूर : शहरासह ग्रामीण भागात अवैध धंदे जोमात सुरू आहेत. दारूविक्री, मटका, जुगार, गुटखा विक्री आदी अवैध धंदे जोमात सुरू आहेत. अवैध धंद्यामुळे युवा पिढी व्यसनाधीन होत असून, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष देऊन अवैध धंद्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

रस्त्यावरील धुळीमुळे चालक, नागरिक त्रस्त

जालना : शहरांतर्गत अंबड मार्गावरील विविध भागात वाहने गेल्यानंतर धूळ मोठ्या प्रमाणात उडत आहे. शिवाय अंबड चौफुली ते उड्डाणपूल परिसरातही अशीच स्थिती आहे. उडणारी धूळ अनेकांच्या दुकानात जात असून, चालकांनाही कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. त्यामुळे या भागातील रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण करावीत, अशी मागणी वाहन चालकांसह नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title: Appeal to obey traffic rules