अनिल भाले यांची तालुकाध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST2021-02-10T04:30:30+5:302021-02-10T04:30:30+5:30

गीता राजगुडे यांची सरचिटणीसपदी निवड चंदनझिरा : भाजप महिला मोर्चाच्या शहर सरचिटणीसपदी चंदनझिरा येथील गीता रामेश्वर राजगुडे यांची निवड ...

Anil Bhale elected as taluka president | अनिल भाले यांची तालुकाध्यक्षपदी निवड

अनिल भाले यांची तालुकाध्यक्षपदी निवड

गीता राजगुडे यांची सरचिटणीसपदी निवड

चंदनझिरा : भाजप महिला मोर्चाच्या शहर सरचिटणीसपदी चंदनझिरा येथील गीता रामेश्वर राजगुडे यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आ. बबन लोणीकर, आमदार संतोष दानवे यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली आहे. राजगुडे यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.

अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईची मागणी

बदनापूर : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरू आहे. तळीरामांमुळे भांडण- तंट्यात वाढ होत असून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय महिला, मुलींनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देऊन कारवाई मोहीम सातत्याने राबविण्याची मागणी होत आहे.

कलापथकाद्वारे काेरोना जनजागृती

परतूर : शासनाच्या वतीने कोरोनाचा धोका आणि दक्षता याबाबत जनजागृती करण्यासाठी कलापथके नियुक्त करण्यात आली आहेत. तालुक्यातील हाताडी येथे आयोजित कार्यक्रमात लोककला व पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. यावेळी शाहीर भास्कर साळवे, गणेश वाघमारे, गिरजा वाघमारे, गणेश घोडे, बापूसाहेब रंधवे, किशोर घोडे, शरद साळवे, हरिभाऊ गायके आदींचा सहभाग होता.

Web Title: Anil Bhale elected as taluka president