अग्रवाल यांच्या निधनाने शहराचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST2021-02-15T04:27:28+5:302021-02-15T04:27:28+5:30

अग्रवाल यांना रविवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पुढे बोलताना दानवे म्हणाले की, माझे आणि त्यांच्या परिवाराचे ३३ वर्षांपासूनचे ...

Agarwal's death caused great damage to the city | अग्रवाल यांच्या निधनाने शहराचे मोठे नुकसान

अग्रवाल यांच्या निधनाने शहराचे मोठे नुकसान

अग्रवाल यांना रविवारी सर्वपक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी पुढे बोलताना दानवे म्हणाले की, माझे आणि त्यांच्या परिवाराचे ३३ वर्षांपासूनचे संबंध होते. दिवाळीच्या फराळासाठी त्यांच्या घरी गेलो नाही, असे कधीच झाले नाही. भाजपचे ते ज्येष्ठ पदाधिकारी होते. कुठलाही मोठा नेता आल्यास अग्रवाल यांच्या निवासस्थांनी त्यांच्या राहण्याची व्यवस्था ही ठरलेली होती. पक्षाने जी जबाबदारी दिली ती नेहमीच ते पूर्ण करत असत, असेही दानवे म्हणाले. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल यांनीही किशोर अग्रवाल हे आमचे एक दिलदार मित्र होते. संकटकाळात अर्ध्यारात्री मदतीला धावून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी आमदार बबनराव लोणीकर, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, कामगार नेते सगीर अहमेद, विनित साहनी, सतीश पंच, उद्योजक सुनील रायठ्ठा, उद्योजक सुरेश अग्रवाल, माजी आ. संतोष सांबरे, उद्योजक अर्जुन गेही, संजय दाड, डॉ. राजेश सेठिया, डॉ. सुभाष अजमेरा, उद्योजक सतीश अग्रवाल, नरेंद्र अग्रवाल, राजेंद्र राख, उद्योजक अरुण अग्रवाल, शर्मा, अनिरुद्ध खोतकर, डॉ. संजय राख, ओमप्रकाश मंत्री, बाला परदेशी, राहुल अग्रवाल, गोवर्धन अग्रवाल, सुनील अग्रवाल, उमेश अग्रवाल, रवि अग्रवाल, राम अग्रवाल, राजेश अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

मोठा भाऊ गेल्याचे दु:ख : अर्जुन खोतकर

किशोर अग्रवाल आणि आपले खूप जुने संबंंध होते. ज्यावेळी त्यांना मुंबईल उपचारासाठी नेले त्या दिवसांपासून आपण त्या रुग्णालयाील डॉक्टरांच्या रोज संपर्कात होतो. आपण अग्रवाल यांना मोठे भाऊच मानत होतो. त्यामुळे त्यांच्या जाण्याने आमच्या परिवारातीलच एक सदस्य आम्ही गमावल्याची मोठी खंत आहे. आपण मुंबईला त्यांना नेले; परंतु त्यांना सुखरूप आणू शकल्याचे शल्य मनाला कायम डिवचत राहील, अशी भावाना माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केली.

Web Title: Agarwal's death caused great damage to the city