शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 21:21 IST

काल 'सेंड ऑफ ' अन् आज अपघातात तरुणाचा मृत्यू, विद्यापीठावर शोककळा

अनिल कुमार मेहेत्रे/ पैठण :पैठण ते छत्रपती संभाजीनगर रोडवर रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका मालवाहू जीप व मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात माय लेकाचा जागीच मृत्यू झाला. समीर राजू शेख आणि मुमताज राजू शेख अशी मृत्यांची नावे आहेत. समीर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात इतिहास विभागात एम ए द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. कालच त्याचा सेंड ऑफ झाला आणि आणि त्याच्या मृत्यूची बातमी आल्याने विद्यापीठावर शोककळा पसरली आहे. 

पैठण पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीर राजू शेख वय 21 मुमताज राजू शेख वय 40 दोघेही राहणार लिंबे जळगाव हे रविवारी सकाळी शेवगाव येथे लग्न सोहळ्यासाठी  एका मोटरसायकलवर गेले होते. लग्न सोहळा आटोपून परत शेवगाव येथून मोटरसायकलवर आपल्या गावाकडे लिंबे जळगाव येथे जात असताना रविवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास पैठण ते छ्त्रपती संभाजीनगर रोडवर पैठण जवळ असलेल्या महेश ट्रेडर्स समोर पौर्णिमा हॉटेल जवळ एका मालवाहू पिकप जीपने मोटरसायकलला जोराची धडक दिली.

या अपघातात समीर राजू शेख वय २१  मुमताज राजू शेख वय ४० या माय लेकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पैठण पोलिसांना मिळतात पैठण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली अपघातामध्ये मरण पावलेले समीर राजू शेख व मुमताज राजू शेख यांना उतरणीय तपासणीसाठी पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. पैठण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. सध्या तरी पैठण पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख करत आहे

विद्यापीठावर शोककळासमीर विद्यापीठांमध्ये इतिहास विभागात एम ए द्वितीय वर्षांमध्ये शिक्षण घेत होता. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याने तो काम करून शिखन घेत adrm  समीर अत्यंत होतकरू मुलगा होता. रात्री आडत दुकानांमध्ये काम करून दिवसा तो शिक्षण घेत असे. कालच इतिहास विभागांमध्ये द्वितीय वर्षाच्या मुलांना सेंड ऑफ देण्यात आला यावेळी समीर खूप खुश होता त्याने खूप मस्ती केली आज सकाळी सर्वांना सेंड ऑफ चे फोटो ही त्याने सेंड केले आणि सायंकाळी त्याच्या मृत्यूची वार्ता धडकली यामुळे इतिहास विभागासह विद्यापीठावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Accidentअपघातpaithan-acपैठणAurangabadऔरंगाबादJalanaजालना