शहागड (ता. अंबड): सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी झुंबड उडत आहे. याच गर्दीचा फायदा घेत शहागड बसस्थानकावर महिला चोरट्यांच्या टोळीने एका प्रवाशाला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. उदगीर येथील सुजाता विजय पवार या लग्नावरून परतत असताना, बसमध्ये चढताना त्यांच्या पर्समधील ७ तोळे सोन्याचे दागिने शिताफीने चोरण्यात आले.
असा मारला डल्ला
सुजाता पवार या बसमध्ये चढत असताना अज्ञात महिलांनी त्यांच्या पर्सची चैन उघडली. काही क्षणांतच चोरट्यांनी १ लाख ६३ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. यामध्ये ४० ग्रॅमचे गंठण, १५ ग्रॅमचा नेकलेस, ३ ग्रॅमची ठुशी आणि ८ ग्रॅमच्या दोन अंगठ्यांचा समावेश आहे. चोरी केल्यानंतर संशयित महिलांनी स्थानकात उभ्या असलेल्या एका रिक्षामध्ये बसून तिथून सिनेस्टाइल पलायन केले.
सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू
चोरी झाल्याचे लक्षात येताच सुजाता पवार यांनी शहागड पोलीस चौकी गाठली. त्यांच्या फिर्यादीवरून गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण हावले या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
Web Summary : In Shahagad, a woman lost gold jewelry worth ₹1.63 lakh from her purse while boarding a crowded bus. Police are investigating using CCTV footage after the theft, which involved a gang of female thieves escaping in a rickshaw.
Web Summary : शहागढ़ में एक महिला के पर्स से भीड़ भरी बस में चढ़ते समय 1.63 लाख रुपये के सोने के गहने चोरी हो गए। पुलिस सीसीटीवी फुटेज का उपयोग करके जांच कर रही है। महिला चोरों का गिरोह रिक्शा में फरार हो गया।