शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
3
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
4
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
8
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
9
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
10
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
11
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
12
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
13
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
14
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
15
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
16
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
17
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
18
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
19
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
20
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
Daily Top 2Weekly Top 5

५० वर्षीय प्रौढास ठार मारले, ५०० फूट खोल दरीत ढकलून कारसह मृतदेह जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

नागापूर शिवारातील घटना; पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला भेट, गतवर्षात जिल्ह्यात ३७ खून जालना / सेवली : एका ५० वर्षीय ...

नागापूर शिवारातील घटना; पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाला भेट, गतवर्षात जिल्ह्यात ३७ खून

जालना / सेवली : एका ५० वर्षीय इसमास ठार मारून त्याला गाडीसह ५०० फूट दरीत ढकलून मृतदेह जाळल्याची घटना जालना तालुक्यातील सेवली - पाहेगाव रस्त्यावरील नागापूर शिवारात सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. रमेश नामदेव शेळके (वय ५०, रा. पाहेगाव) असे मयताचे नाव असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे यांनी दिली. दरम्यान, जालना जिल्ह्यात गतवर्षात तब्बल ३७ खून झाले असून, ३६ उघडकीस आल्याची माहिती देण्यात आली, तर ९३ जणांचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश शेळके हे प्रॉपर्टी खरेदी - विक्रीचा व्यवहार करतात. ते शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख आहेत. रविवारी सायंकाळी चारचाकीने ते मेहकर येथे गेले होते. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोठ्या मुलाने फोन करून विचारले असता, रात्री बारा वाजेपर्यंत येत असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सेवली ते पाहेगाव रस्त्यावरील नागापूरजवळ आल्यावर अज्ञातांनी हल्ला करून त्यांना ठार केले व कारसह ५०० फूट खोल दरीत ढकलून दिले. त्यानंतर कारसह मृतदेह जाळण्यात आला. सोमवारी सकाळी पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या काही तरूणांना कार दरीत कोसळलेली दिसली. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता, कारसह मृतदेहाचा सांगाडा झाल्याचे दिसून आले. घटनास्थळापासून काही अंतरावर रक्ताने माखलेला दगड, रूमाल आणि खिशातील पाकीट आढळून आले. पाकिटातील आधार कार्ड पाहिले असता, हा मृतदेह रमेश शेळके यांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मयताच्या मोठ्या मुलाला बोलावण्यात आले. मृतदेह बाहेर काढून विच्छेदन करण्यात आले. घटनास्थळाला पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, परतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांनी भेटी देऊन पाहणी केली. याप्रकरणी मयताचा मुलगा अक्षय रमेश शेळके यांच्या फिर्यादीवरून सेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पंचनामा करण्यासाठी गेलेले सहायक पोलीस निरीक्षक जखमी

परतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांच्यासह सेवली पोलीस ठाण्याचे सपोनि. विलास मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचा पंचनामा करताना सपोनि. मोरे हे दरीत पडल्याने जखमी झाले आहेत. त्यांच्या हाताला फॅक्चर झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तिघे संशयित ताब्यात; भेटण्यासाठी गेलेल्या मित्राचा मोबाईल बंद

रमेश शेळके व त्यांचा मोठा भाऊ यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून जमिनीचा वाद सुरू आहे. मोठा भाऊ, पत्नी, मुलगा यांची पोलीस चौकशी करीत आहे. इतर तीन संशयितांनाही ताब्यात घेतले असल्याची माहिती सपोनि. मोरे यांनी दिली. दरम्यान, रमेश शेळके हे मेहकर येथील ज्या मित्राला भेटण्यासाठी गेले होते. त्याच्याशी पोलिसांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याने मोबाईल बंद केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

माजी मंत्री खोतकर यांची घटनास्थळाला भेट

रमेश शेळके हे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख आहेत. ते मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेचे काम करतात. त्यांचा खून झाल्याची माहिती कळताच माजी राज्यमंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी घटनास्थळी भेट दिली.