शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंढरी कडवंचीतील द्राक्ष उत्पादकांना ५० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:57 IST

३० वर्षांपूर्वी कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्रामस्थांनी एकत्रित येत कृषी विज्ञान केंद्र आणि जर्मन पाणलोट क्षेत्र विकास ...

३० वर्षांपूर्वी कृषिभूषण विजयअण्णा बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील ग्रामस्थांनी एकत्रित येत कृषी विज्ञान केंद्र आणि जर्मन पाणलोट क्षेत्र विकास संस्थेच्या माध्यमातून येथे जलसंधारणाची कामे झाली. माती नालाबांध, बांधबंदिस्ती नदीवर लहान - लहान बंधारे बांधून जमितील पाणीपातळी वाढविली. त्याचा परिणाम म्हणून येथे द्राक्ष बागांची लागवड करून येथील शेतकऱ्यांनी स्वत:च्या परिश्रमातून कृषी क्रांती केली. आज जवळपास दीड हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या कडवंचीत जवळपास दोन हजार हेक्टरवर बागा फुलल्या आहेत.

गेल्या दहा ते पंधरा वर्षात येथील शेतकऱ्यांनी शेती हेच आपले घर मानून अनेकजण हे गावात राहण्याऐवजी शेतात राहणेच पसंत करतात. आज या द्राक्ष उत्पादनात सोनाका, माणिक चमन या जातींची द्राक्षे घेतली जातात. आत उन्हाळा सुरू झाला असून, यामुळे द्राक्ष बागांचा हंगाम तेजीत आहे. यंदा जबलपूर, चिखली तसेच अन्य गावांमधून बागा खरेदी करणाऱ्या बागायतदारांनी द्राक्ष बागांची खरेदी सुरू केली आहे. हे खरे असले तरी, गेल्या वेळच्या तुलनेत यंदा द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

चौकट

गेल्यावर्षी ७२ कोटींची उलाढाल

गेल्यावर्षी चांगले वातावरण राहिल्याने द्राक्ष उत्पादकांना त्यांच्या श्रमाचे फळ मिळाले होते. गेल्या हंगामात जवळपास ७३ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. ती यंदा केवळ दहा ते १२ कोटींवर येऊन ठेपली आहे. यामुळे यंदा शेतीत केलेला खर्च निघणेही अवघड झाले आहे.

मदतीची अपेक्षा

अतिवृष्टी तसेच परतीचा पाऊस यामुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाकडून मदत मिळाली. परंतु ही मिळालेली मदत द्राक्ष उत्पादकांसाठी अत्यंत कमी आहे. ही मदत आणखी वाढवून मिळावी, अशी या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे. एवढे होऊनही शेतकरी आपली हिंमत हरला नसून, एप्रिलमध्ये द्राक्ष बागांची दुसरी छाटणी असते, त्यावेळी तरी चांगले उत्पादन येईल, अशी आशा येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.