शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पांमध्ये ४८ टक्के उपयुक्त जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:18 IST

परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७.९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण ६४ पैकी ४० प्रकल्पांमध्ये हा उपयुक्त पाणीसाठा असून, इतर २३ प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर एक प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे

ठळक मुद्देपाणीप्रश्न मार्गी । ६४ पैकी ४० प्रकल्पांत उपयुक्त साठा

जालना : परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये ४७.९२ टक्के उपयुक्त पाणीसाठा वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण ६४ पैकी ४० प्रकल्पांमध्ये हा उपयुक्त पाणीसाठा असून, इतर २३ प्रकल्प जोत्याखाली आहेत. तर एक प्रकल्प अद्यापही कोरडाठाक आहे. प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शहरी, ग्रामीण भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागला आहे.यंदा आॅक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत वार्षिक सरासरीच्या जवळपास ७५ टक्क्यांपर्यंत पाऊस झाला होता. त्यानंतर मात्र, परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ६८८.२१ मिमी ओलांडत एकूण ८०० मिमीहून अधिक पाऊस जिल्ह्यात झाला. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ होण्यास मोठी मदत झाली आहे. जालना जिल्ह्यात एकूण ६४ मध्यम व लघू प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत ४७.९२ टक्के उपयुुक्त पाणीसाठा झाला आहे. यात १० प्रकल्पांमध्ये ७६ ते १०० टक्क्यांच्या मध्ये उपयुक्त पाणीसाठा आहे. ७ प्रकल्पात ५१ ते ७५ टक्क्यांच्या मध्ये, ५ प्रकल्पात २६ ते ५० टक्क्यांच्या मध्ये तर १८ प्रकल्पात २५ टक्क्यांपर्यंत उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. २३ प्रकल्प अद्यापही जोत्याखाली असून, केवळ एक प्रकल्प कोरडाठाक आहे. प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने बहुतांश भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मार्गी लागला आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांपैकी केवळ जालना तालुक्यातील कल्याण गिरीजा प्रकल्प जोत्याच्या पातळीखाली आहे. तर कल्याण मध्यम प्रकल्पात ३१.१८ टक्के, बदनापूर तालुक्यातील अप्पर दुधना प्रकल्पात १३.८८ टक्के, भोकरदन तालुक्यातील जुई प्रकल्पासह धामणा प्रकल्प १०० टक्के भरला आहे. जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा प्रकल्पात ४८ टक्के तर अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्पात ६०.२६ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.

टॅग्स :JalanaजालनाWaterपाणीRainपाऊस