अपात्र ३७० विद्यार्थ्यांनी घेतला शिष्यवृत्तीचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:58 IST2021-02-05T07:58:40+5:302021-02-05T07:58:40+5:30

शिक्षण विभागाची मोहीम; ३० शाळांची केली तपासणी जालना : प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र लाभार्थ्यांची शोधमोहीम शिक्षण ...

370 ineligible students availed scholarships | अपात्र ३७० विद्यार्थ्यांनी घेतला शिष्यवृत्तीचा लाभ

अपात्र ३७० विद्यार्थ्यांनी घेतला शिष्यवृत्तीचा लाभ

शिक्षण विभागाची मोहीम; ३० शाळांची केली तपासणी

जालना : प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेल्या अपात्र लाभार्थ्यांची शोधमोहीम शिक्षण विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. याअंतर्गत ३० शाळांची तपासणी करण्यात आली असून, जवळपास ३७० विद्यार्थी बनावट असल्याचे शिक्षण विस्ताराधिकारी नारायण कुमावत यांनी सांगितले.

प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेत अपात्र असलेल्या लाभार्थ्यांचा शोध घेण्याचा आदेश राज्य शासनाने दिला आहे. त्यानुसार शिक्षणाधिकारी आशा गरुड व उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात बनावट लाभार्थी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शिक्षण विस्तार अधिकारी नारायण कुमावत, जिल्हा नोडल अधिकारी पी.एस. रायमल, तालुका नोडल अधिकारी कल्याण गव्हाणे, तालुका नोडल अधिकारी लक्ष्मण मोरे यांनी ३० शाळांची तपासणी केली. या ३७० विद्यार्थी बनावट आढळून आले आहेत.

Web Title: 370 ineligible students availed scholarships