शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

१,३२५ कर्मचाऱ्यांना मिळणार लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST

दिलीप सारडा बदनापूर : तालुक्यातील आरोग्य विभागातील १,३२५ डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस देण्यात येणार आहे, तर दुसऱ्या ...

दिलीप सारडा

बदनापूर : तालुक्यातील आरोग्य विभागातील १,३२५ डॉक्टर, कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस देण्यात येणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह पत्रकारांना लस देण्यात येणार आहे. लसीकरणाची पूर्वतयारी आरोग्य विभागाकडून करण्यात आली असून, त्याची रंगीत तालीमही घेण्यात आली आहे.

बदनापूर तालुक्यात लवकरच कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. बदनापूर ग्रामीण रुग्णालय, वरुडी येथील वैद्यकीय महाविद्यालय, वाकुळणी, शेलगाव, सोमठाणा, दाभाडी प्राथमिक केंद्रात हे लसीकरण केले जाणार आहे. प्रत्येक केंद्रात आरोग्यसेविका, आशा, शिक्षक, पोलीस, असे एकूण पाच कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. शिवाय वाढीव पाच कर्मचारी प्रत्येक केंद्रात राखीव ठेवण्यात येणार आहेत. कोरोना लसीकरणाबाबत ६० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून, सहा नोडल अधिकारी व एका तालुका आरोग्य अधिकाऱ्याचे लसीकरणावर लक्ष राहणार आहे.

तालुक्यातील रोशनगाव येथील आयुर्वेद दवाखान्यातील ३ कर्मचारी, बदनापूर येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील २० कर्मचारी, ग्रामीण रुग्णालय, बदनापूर येथील ३३ कर्मचारी, वाकुळणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील २०२ कर्मचारी, शेलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील २२७ कर्मचारी, सोमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील १६८ कर्मचारी, दाभाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील २५६ कर्मचारी असे एकूण ९०९ शासकीय आरोग्य कर्मचारी तसेच वरुडी येथील जेआयआययूएसआयआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील ३०५ कर्मचारी, शेलगाव येथील गुरुमिश्री होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमधील ५८ कर्मचारी, बदनापूर शहरातील खासगी दवाखान्यांमधील ४८ व शेलगाव येथील खासगी दवाखान्यांमधील ५, अशा एकूण १,३२५ कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे, तर तिसऱ्या टप्प्यात नागरिकांना लस दिली जाणार आहे. लसीकरणाचा तिसरा टप्पा मोठा राहणार आहे, तर चौथ्या टप्प्यात उच्च रक्तदाब, मधुमेह आदी विविध आजारांतील रुग्णांना लस देण्यात येणार आहे.

- डॉ. योगेश सोळुंके,

तालुका आरोग्य अधिकारी, बदनापूर