१३ जणांची तिघांना मारहाण ; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:31 AM2021-01-20T04:31:26+5:302021-01-20T04:31:26+5:30

--------------------------------- ४८ हजारांचा मुद्देमाल लंपास जालना : घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी दोन फायबरच्या खुर्च्या, एक लोखंडी बाज ...

13 people beat three; Filed a crime | १३ जणांची तिघांना मारहाण ; गुन्हा दाखल

१३ जणांची तिघांना मारहाण ; गुन्हा दाखल

googlenewsNext

---------------------------------

४८ हजारांचा मुद्देमाल लंपास

जालना : घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी दोन फायबरच्या खुर्च्या, एक लोखंडी बाज व रोख रक्कम असा ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना जालना शहरातील लक्ष्मीनगर येथे घडली. या प्रकरणी श्रीनिवास बालकिसन गुडुर यांच्या फिर्यादीवरून तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

------------------------

महिलेस जीवे मारण्याचा प्रयत्न

जालना : विनाकारण तिघांनी महिलेस कुऱ्हाडीने मारहाण करून जखमी केल्याची घटना परतूर तालुक्यातील हातडी येथे १६ जानेवारी रोजी घडली. यात चंदाबाई मदनराव हिवाळे (३०, रा. हातडी) या गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणी चंदाबाई मदनराव हिवाळे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी वैजिनाथ मांगडे (रा. जांबसमर्थ) याच्याविरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पो.ना. फुपाटे आदी करीत आहेत.

-----------------------------

एकास तिघांची मारहाण : गुन्हा दाखल

जालना : तुझ्या भावाने आमच्याविरुद्ध साक्ष का दिली, असे म्हणत एकास तिघांनी मारहाण केल्याची घटना परतूर तालुक्यातील फुलवाडी येथे १५ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी मुंजा श्यामराव वाघमारे यांच्या फिर्यादीवरून वामन नारायण वाघमारे, बाळासाहेब वाघमारे, महेंद्र लहाडे (रा. फुलवाडी) यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील सपोनि भागवत हे करीत आहेत.

---------------------------

२५ टन ऊस चोरी; आठ जणांविरुद्ध गुन्हा

जालना : फिर्यादीच्या भावास जीवे मारण्याच्या धमक्या देऊन ५० हजार रुपये किमतीचा २५ टन ऊस चोरून नेल्याची घटना परतूर तालुक्यातील रायगव्हाण शिवारात घडली. याप्रकरणी विजय बळीराम कडपे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी महादेव पोटे, एकनाथ महादेव पोटे, मुरली गणपत केकान, सिद्धेश्वर मुरली केकान, गोपाळ महादेव पोटे, हरीभाऊ बाजीराव पोटे, सुरे हरीभाऊ पोटे (सर्व रा. रायगव्हाण), पाराजी नारायण बान (बाणाची वाडी, ता. परतूर) यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्हाध्यक्षपदी सतीश जाधव

जालना : राजमाता सोशल ग्रुपच्या जालना जिल्हा अध्यक्षपदी सतीश जाधव यांची निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष रवी राऊत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी विनोद पवार, सुधीर राऊत, खंडेश जाधव, विनोद कुमावत, रवींद्र डुरे, प्रा. राजेश फदाट, विजय राऊत, अजय राऊत, सतीश कुरील, विलास तिकांडे, जगदीश चोरडीये आदींची उपस्थिती होती.

--------------------------------------

Web Title: 13 people beat three; Filed a crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.