लॉकडाऊनच्या काळात बंद झालेल्या ११ बसफेऱ्या बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:30 IST2021-02-10T04:30:49+5:302021-02-10T04:30:49+5:30

जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान एसटी महामंडळाला सहन करावे लागत आहे. असे असेल तरी सर्व बसेस हळूहळू सुरू करण्यासाठी ...

11 buses closed during lockdown | लॉकडाऊनच्या काळात बंद झालेल्या ११ बसफेऱ्या बंदच

लॉकडाऊनच्या काळात बंद झालेल्या ११ बसफेऱ्या बंदच

जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान एसटी महामंडळाला सहन करावे लागत आहे. असे असेल तरी सर्व बसेस हळूहळू सुरू करण्यासाठी महामंडळाकडून प्रयत्न केले जात आहे. जवळपास सर्वच शाळा सुरू झाल्या आहेत. १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालयेदेखील सुरू केली जाणार आहे. ग्रामीण भागातून येणारे बहुतांश विद्यार्थीही बसनेच प्रवास करतात. त्यामुळे येणाऱ्या काळात लॉकडाऊनमध्ये बंद झालेल्या बसफेऱ्या पुन्हा सुरू होईल, अशी आशा विभागीय वाहतूक नियंत्रक नेहूळ यांनी व्यक्त केली.

तीन लाखांचे उत्पन्न घटले

कोरोनामुळे असलेल्या लॉकडाऊनमुळे एस. टी. महामंडळाचे तब्बल तीन लाखांचे उत्पन्न घटले आहे. सध्या महामंडळाला २० लाखांचे उत्पन्न होत आहे. येणाऱ्या काळात बस सुरू झाल्यानंतर उत्पन्नात वाढ होईल, असे सांगण्यात आले.

सध्या शाळा सुरू झाल्या आहेत. १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू केली जाणार आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी बसनेच प्रवास करतात. यासाठी ग्रामीण भागातील बस सुरू कराव्यात.

गणेश पवळ, प्रवासी

बस बंद असल्याने हाल होत आहेत. सामान्य प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यात आर्थिक लूटही होते, शिवाय सुरक्षिततेचा प्रश्नही उपस्थित होतो. त्यामुळे सर्व बसेस सुरू करून हा थांबविणे गरजेचे आहे.

भिका राऊत, प्रवासी

लॉकडाऊनंतर परिस्थिती पूर्ववत होत आहे. जवळपास ९० टक्के बसेस धावत आहेत. यापुढेही मागणी येईल, तशा बसेस सोडल्या जाईल. तशा सूचनाही आगारप्रमुखांना दिल्या आहेत. प्रवाशांचे हाल होणार नाहीत. याची काळजी घेतली जात आहे.

नेहूळ विभाग नियंत्रक

Web Title: 11 buses closed during lockdown