१९२ देशांमध्ये ‘योग’साधनेचा मेळा

By Admin | Updated: June 22, 2015 00:47 IST2015-06-22T00:47:27+5:302015-06-22T00:47:27+5:30

पहिला जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी हजारो लोकांनी रविवारी उत्साहाने आपला सहभाग नोंदविला. जगात ठिकठिकाणी लोक आपले

The 'Yoga' Melody Fair in 192 countries | १९२ देशांमध्ये ‘योग’साधनेचा मेळा

१९२ देशांमध्ये ‘योग’साधनेचा मेळा

मेलबर्न/लंडन : पहिला जागतिक योग दिन साजरा करण्यासाठी हजारो लोकांनी रविवारी उत्साहाने आपला सहभाग नोंदविला. जगात ठिकठिकाणी लोक आपले शरीर ताणत होते, वाकवत होते आणि वेगवेगळ्या योगमुद्रा करीत होते. जगभरातील १९२ देशांमधील २२५ शहरांमध्ये योगदिन साजरा करीत भारताच्या मोहिमेत भरीव योगदान दिले.
आॅस्ट्रेलियात विविध शहरांत योग दिन साजरा झाला आणि प्रत्येक ठिकाणी हजारांपेक्षा जास्त लोक योगासने करताना दिसत होते. पंतप्रधान टोनी अ‍ॅबॉट यांनीही योगाच्या जागतिक आवाहनाचे कौतुक केले. मेलबर्नमधील स्प्रिंग लीझर सेंटरमध्ये ५०० लोक सूर्यनमस्कार घालताना दिसत होते.
थेम्स नदीच्या काठावर समारंभ
ब्रिटनमधील अनेक शहरांत योग दिन साजरा झाला. मुख्य समारंभ लंडन शहरात थेम्स नदीच्या काठी झाला. थेम्स नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर बर्नी स्पेन गार्डनमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला.
सिंगापूरमधील दोन तास
सिंगापूरमध्ये ५० केंद्रांवर योग दिनाचे कार्यक्रम झाले. त्यात ४ हजारांपेक्षा जास्त लोक सहभागी होते. या कार्यक्रमाचे नेतृत्व सिंगापूरमधील भारताचे उच्चायुक्त विजय ठाकूर सिंग यांनी तसेच सिंगापूरच्या पंतप्रधान कार्यालयातील मंत्री ग्रेस फू यांनी केले.
थायलंडमध्ये योगा स्टुडिओ
थायलंडमध्ये बँकॉक विद्यापीठाच्या मैदानावर योगा स्टुडिओ उभारण्यात आला. हजारो भारतीयांसह परदेशी लोकांनी योगासनांच्या कार्यक्रमात अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला. चालुलोंगकोर्न विद्यापीठाच्या मैदानात दूतावासातर्फे कार्यक्रम आयोजिण्यात आला. (वृत्तसंस्था)
 

Web Title: The 'Yoga' Melody Fair in 192 countries