...म्हणून भारत-EU कराराला म्हटलं जातंय "मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स'! ट्रम्प यांना १२ हजार व्होल्टचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 17:23 IST2026-01-27T17:22:14+5:302026-01-27T17:23:16+5:30

यासंदर्भा बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, याकडे केवळ व्यापार करार म्हणून न बघता, हा एक 'सामायिक मूल्यांचा विजय' आहे. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनीही, "आज इतिहास घडला," असे म्हणत आनंद व्यक्त केला.

why the India-EU agreement is being called the Mother of All Trade Deals Trump will get a shock of 12000 volts | ...म्हणून भारत-EU कराराला म्हटलं जातंय "मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स'! ट्रम्प यांना १२ हजार व्होल्टचा झटका

...म्हणून भारत-EU कराराला म्हटलं जातंय "मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स'! ट्रम्प यांना १२ हजार व्होल्टचा झटका

भारत आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेनंत असलेला मुक्त व्यापार करार (FTA) अखेर पूर्ण झाला. या ऐतिहासिक कराराला 'मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स' म्हणून संबोधले जात आहे. या करारांतर्गत जागतिक जीडीपीचा २५ टक्के हिस्सा आणि सुमारे २ अब्ज ग्राहक एवढी विशाल बाजारपेठ एकमेकांशी जोडली गेली आहे. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सोमवारी या वृत्ताला दुजोरा दिला, यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (२७ जानेवारी २०२६) या कराराची अधिकृत घोषणा केली.

भारताची जागतिक पुरवठा साखळीतील भूमिका अधिक बळकट होईल -
महत्वाचे म्हणजे, २०१३ मध्ये सुरू झालेली ही चर्चा अनेक मतभेदांनंतर आज फलद्रुप झाली आहे. करे तर मध्यतरी चर्चेत खंड पडला होता. मात्र, जून २०२२ मध्ये पुन्हा सुरू झालेल्या या चर्चेला आता यश आले आहे. या करारामुळे भारताला २७ युरोपियन देशांच्या बाजारपेठेत थेट प्रवेश मिळून जागतिक पुरवठा साखळीतील भूमिका अधिक बळकट होईल. 

यापूर्वी, २०२३-२४ मध्ये युरोपियन युनियन भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार राहिला आहे. दोहोंमध्ये १३५ अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि युरोपमधील हा करार धोरणात्मक दृष्ट्य अत्यंत महत्वाचा माणला जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका मावला जात आहे.

आम्ही ‘मदर ऑफ ऑल डील्स’ पूर्ण केली -
युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी या कराराला 'मदर ऑफ ऑल डील्स' म्हणून संबोधले आहे. एवढेच नाही तर, 'ही तर केवळ सुरुवात' असल्याचेही त्या म्हणाल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत उर्सुला वॉन डेर लेयेन म्हणाल्या, "आज युरोप आणि भारत इतिहास घडवत आहेत. आम्ही ‘मदर ऑफ ऑल डील्स’ पूर्ण केली असून, दोन अब्ज लोकांसाठी मुक्त व्यापार क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे दोन्ही बाजूंना फायदा होईल. ही तर केवळ सुरुवात आहे. आम्ही आमची दोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करू."

कुणाला होणार सर्वाधिक फायदा - 
या करारानुसार, ९७ टक्क्यांहून अधिक भारतीय उत्पादनांना युरोपियन बाजारपेठेत ड्यूटी-फ्री (शुल्कमुक्त) प्रवेश मिळेल. याचा सर्वाधिक फायदा होईल तो, कापड, चामडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्स आणि रसायन या क्षेत्रांना. 

यासंदर्भा बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, याकडे केवळ व्यापार करार म्हणून न बघता, हा एक 'सामायिक मूल्यांचा विजय' आहे. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनीही, "आज इतिहास घडला," असे म्हणत आनंद व्यक्त केला.
 

Web Title : भारत-यूरोपीय संघ व्यापार समझौता: 'मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स' से ट्रम्प को झटका!

Web Summary : भारत और यूरोपीय संघ ने मुक्त व्यापार समझौते को अंतिम रूप दिया, जिसे 'मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स' कहा जा रहा है। यह एक विशाल बाजार को जोड़ता है, जिससे भारत की वैश्विक आपूर्ति श्रृंखला की भूमिका मजबूत होगी। कपड़ा और इलेक्ट्रॉनिक्स जैसे प्रमुख क्षेत्रों को शुल्क-मुक्त पहुंच से लाभ होगा।

Web Title : India-EU trade deal: A 'Mother of All Trade Deals' shocks Trump!

Web Summary : India and the EU have finalized a free trade agreement, dubbed the 'Mother of All Trade Deals.' It links a vast market, strengthening India's global supply chain role. Key sectors like textiles and electronics will benefit from duty-free access.