पाकिस्तानातील शाही लग्नात ‘पाहुणी’च भाव खाऊन गेली! कोण आहे चर्चेतला चेहरा मरियम औरंगजेब?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 09:25 IST2026-01-22T09:25:21+5:302026-01-22T09:25:49+5:30

पाकिस्तानच्या सत्तारूढ पक्ष ‘पीएमएल-एन’च्या त्या वरिष्ठ नेत्या आणि मंत्री आहेत.

who is marriyum aurangzeb pakistan minister goes viral for stark face transformation at Junaid Safdar wedding | पाकिस्तानातील शाही लग्नात ‘पाहुणी’च भाव खाऊन गेली! कोण आहे चर्चेतला चेहरा मरियम औरंगजेब?

पाकिस्तानातील शाही लग्नात ‘पाहुणी’च भाव खाऊन गेली! कोण आहे चर्चेतला चेहरा मरियम औरंगजेब?

पाकिस्तानातील एक लग्न जगभरात सध्या फारच चर्चेत आहे. हे लग्न होतंच तसं जंगी; कारण पाकिस्तानातल्या अतिशय प्रतिष्ठित अशा तालेवार कुटुंबातील हे लग्न होतं. नवरा-नवरीही एकमेकांना अनुरूप होते, त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे राजेशाही थाटात हे लग्न लागलं, अतिशय सुंदर आणि देखण्या वधू-वरांचं वऱ्हाडी मंडळींनी वारेमाप कौतुक केलं; पण या साऱ्यापेक्षाही या लग्नाला पाहुणी म्हणून आलेली एक महिला या लग्नात सगळा भाव खाऊन गेली. या वऱ्हाडी महिलेचं नाव आहे मरियम औरंगजेब. पाकिस्तानच्या सत्तारूढ पक्ष ‘पीएमएल-एन’च्या त्या वरिष्ठ नेत्या आणि मंत्री आहेत.

लाहोरमध्ये पार पडलेलं हे लग्न होतं पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा नातू तसंच पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांचे पुत्र जुनैद सफदर आणि नवाज शरीफ यांचे जुने सहकारी शेख रोहैल असगर यांची नात शांजेह अली रोहैल यांचं. मरियम औरंगजेब या लग्नाला पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या; पण वधूपेक्षाही त्या देखण्या दिसत होत्या! अलीकडेच त्यांनी आपला जो लुक बदलला आणि त्यांच्या रूपात, व्यक्तिमत्त्वात जो बदल झाला, त्यामुळे सगळ्यांनीच आश्चर्यानं तोंडात बोटं घातली. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकरीही फिदा झाले. मरियम यांनी आपल्या मूळ रूपात इतका बदला कसा केला, याची चर्चा अजूनही जगभरात सुरू आहे. त्यांच्या बदललेल्या रूपाचे फोटो तर प्रचंड व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये मरियम औरंगजेब पूर्वीपेक्षा अधिक स्लिम, अधिक सुंदर आणि बदललेल्या लुकमध्ये दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेक युजर्सनी त्यांच्या ग्लो आणि फिटनेसचं कौतुक केलं. मात्र काही लोकांनी त्यांच्या लुकमध्ये झालेल्या बदलांबाबत प्रश्नही उपस्थित केले. मरियम औरंगजेब यांनी कॉस्मेटिक सर्जरी करून घेतल्याच्या चर्चांनाही त्यामुळे वेग आला.

४५ वर्षीय मरियम औरंगजेब २०१३ पासून पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज पक्षाशी संबंधित आहेत. सध्या त्या पंजाब सरकारमध्ये वरिष्ठ मंत्री आहेत. माहिती, पर्यावरण संरक्षण, नियोजन, वन, मत्स्य पालन, वन्यजीव आणि विशेष उपक्रम अशी महत्त्वाची खाते त्यांच्या ताब्यात आहेत.

वरिष्ठ मंत्री असल्यामुळे त्यांच्या नावाचा पाकिस्तानात दबदबा तर आहेच. त्यांच्या कामाची, त्यांच्या कार्यपद्धतीचीही कायम चर्चा होत असते, पण या लग्नातील त्यांच्या उपस्थितीमुळे आणि त्यांच्या नव्या रूपामुळे त्यांच्या कार्यापेक्षा सगळी चर्चा त्यांच्या सौंदर्यावरच एकवटली.

मरियम यांनी आपलं रूप बदलण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी केली असावी, याबद्दल तर अनेकांनी पैजाही लावल्या; कारण पूर्वीपेक्षा त्या खूपच सडपातळ झालेल्या होत्या, त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पूर्णपणे नाहीशा झाल्या होत्या, त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय तजेला आलेला होता, त्यांच्या चेहऱ्याची ठेवण बदलली होती, त्यांचं वजन कमी झालेलं होतं आणि कोणत्याही चित्रपट अभिनेत्रीला लाजवेल इतक्या मोहक त्या दिसत होत्या. त्यांच्या रूपाबद्दल, त्यांनी खरंच सर्जरी केली का आणि कोणाकडून याबद्दल अनेकांना प्रश्न पडले आहेत; पण मरियम यांनी मात्र त्याबद्दल अजून तरी कोणालाच काहीच थांगपत्ता लागू दिलेला नाही.

Web Title : पाकिस्तानी शादी में मेहमान ने बटोरी सुर्खियां: मरियम औरंगजेब कौन हैं?

Web Summary : पाकिस्तान में एक शादी में मरियम औरंगजेब ने सबका ध्यान खींचा। उनकी बदली हुई दिखावट ने कॉस्मेटिक सर्जरी की अफवाहों को जन्म दिया। 45 वर्षीय मंत्री की फिटनेस और चमक शादी से ज़्यादा चर्चा में रही।

Web Title : Pakistani Wedding Guest Steals the Show: Who is Maryam Aurangzeb?

Web Summary : Maryam Aurangzeb, a PML-N leader, stole the spotlight at a Pakistani wedding. Her changed appearance sparked cosmetic surgery rumors. The 45-year-old minister's glow and fitness became major talking points, overshadowing the wedding itself.