शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

Corona Vaccine: अमेरिका भारताला कोरोना लसीचा कच्चा माल देईना; कारणही सांगेना!, नेमका विचार काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 12:15 PM

Corona Virus Vaccine:  अमेरिकेनं कोरोना विरोधी लस बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवल बंदी घातली आहे.

Corona Virus Vaccine:  अमेरिकेनं कोरोना विरोधी लस बनविण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवल बंदी घातली आहे. अमेरिकेनं घातलेल्या निर्यात बंदीच्या निर्णयाबाबत भारतानं व्हाईट हाऊसशी दोन वेळा संपर्क करुन यामागचं कारण विचारण्याचा प्रयत्न केला. पण व्हाइट हाऊसकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियानं (Serum Institute of India) अमेरिकेकडे बंदी हटविण्याची विनंती केली आहे. जेणेकरुन लसीचे उत्पादन अधिक वेगानं होऊ शकेल. (White House refuses to comment on lifting ban on COVID 19 vaccine raw materials export to India)

धक्कादायक! ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १२ कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू

लस तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यात बंदी संबंधी दोनवेळा व्हाईट हाऊसला प्रश्न विचारण्यात आला. कोविड-१९ संदर्भात नेहमीप्रमाणे व्हाइट हाऊसमध्ये सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेत याबाबतचा सवाल विचारण्यात आला. व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव जैन पाक्सी यांच्याद्वारे परिषद आयोजित केली जाते. त्यांना कच्च्या मालाच्या निर्यात बंदीबाबत विचारण्यात आलं. दरम्यान, दोनही वेळेस व्हाइट हाऊसकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता अमेरिकेनं लावलेली निर्यात बंदी लवकरात लवकर उठवणं अतिशय गरजेचं होऊन बसलं आहे. 

कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडरचा पर्याय ठरू शकते DRDO ची नवीन प्रणाली

सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनानं कोरोना लस निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. सीरमनं बंदी हटविण्यासाठी बायडन यांच्याकडे विनंती देखील केली आहे, त्यामुळे नेमकं कोणता कच्चा माल येथून भारताला जातोय आणि सीरमची समस्या सोडविण्यासाठी तुमची योजना काय?, असा सवाल एका पत्रकारानं व्हाइट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत विचारला. 

कोरोनाचा वेग सुस्साट! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण, 1,761 जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या कोविड-१९ रिस्पॉन्स टीममधील वरिष्ठ सल्लागार आणि नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ अॅलर्जी अँड इन्फेक्शन डिसीजचे संचालक डॉ. अँथनी फॉसी आणि डॉ. अँडी स्लेवीट यांनी पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नावर कोणतीही प्रतिक्रया देणं टाळलं. "मला माफ करा, मला याबाबत कोणतीही माहिती नाही. मला तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं. पण याबाबत सध्या माझ्याकडे कोणतंही उत्तर नाही", असं डॉ. फॉसी यांनी म्हटलं. तर डॉ. स्लेवीट म्हणाले की,"आपण सध्या महामारीच्या जागतिक संकटाचा सामना करत असून अतिशय गांभीर्यानं याकडे पाहात आहोत. आम्ही कोव्हॅक्सला निधी पुरवला आहे. द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर लसीचा पुरवाठा करण्यात आला आहे आणि प्रत्येक समस्येचं निराकरण करण्यासाठी कटिबद्ध आहोत"

१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर

अमेरिकेकडून लसीच्या कच्च्या मालाच्या निर्यात बंदीच्या निर्णयाबाबत आणखी एका पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. "भारत सध्या कोरोना लस उत्पादन करण्याच्या कच्च्या मालाच्या तुटवड्याच्या समस्येचा सामना करत आहे. तेथील अधिकारी कच्च्या मालाच्या निर्यात बंदी हटविण्याचा आग्रह करत आहेत. बायडन प्रशासन याबाबत विचार करत आहे, असं भारताच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. याबाबत तुम्ही अधिक माहिती आणि नेमका कितीवेळ लागेल याबाबत सांगू शकता का?", असा प्रश्न एका पत्रकारानं विचारला होता. 

"विकसीत आणि विकसनशील देशांमध्ये कोरोना लसीच्या पुरवठ्या संदर्भात जी असमानता दिसत आहे. ती अतिशय अस्विकारार्ह आहे", असं उत्तर व्हाइट हाऊसकडून देण्यात आलं आहे.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसJoe Bidenज्यो बायडनUSअमेरिकाPuneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस