Covid Vaccination Open For Everyone Above 18 From 1 May What New How To Register | Corona Vaccination: १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर

Corona Vaccination: १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर

नवी दिल्ली: देशात कोरोना रुग्णांचा झपाट्यानं वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी देशात पहिल्यांदा एका दिवसात कोरोनाचे १ लाख नवे रुग्ण आढळून आले. त्यानंतर १० दिवसांमध्ये हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला. काल देशात जवळपास पावणे तीन लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्यानं केंद्र सरकारनं काल महत्त्वाचा निर्णय घेतला. १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस देण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे. (Covid Vaccination Open For Everyone Above 18 From 1 May What New How To Register)

लवकरच नवा नियम; किराणा दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ पर्यंत

१ मेपर्यंत देशातील बाजारपेठेत कोरोना लस उपलब्ध होण्याची दाट शक्यता आहे. या लसीची किंमत काय असणार याबद्दलचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. यापुढे राज्य सरकारं थेट कंपन्यांकडून कोरोना लसींची खरेदी करू शकतात. याआधी लस पुरवठ्यावरून केंद्र विरुद्ध राज्य असा 'सामना' पाहायला मिळाला होता. केंद्राकडून लसींचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला जात नसल्याची तक्रार काही राज्यांकडून केली जात होती. त्यात महाराष्ट्राचाही समावेश होता.

मायक्रो कंटेन्मेंट झोनमधील नियम मोडल्यास दहा हजारांचा दंड

१८ वर्षांवरील सर्वांना लस; जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया
१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेता येईल. यासाठी आधी नोंदणी करावी लागेल. कोविन ऍप किंवा आरोग्य सेतु ऍपवर तुम्ही लसीकरणासाठी नोंदणी करू शकता. त्यासाठी ऍपवर आवश्यक माहिती भरून तुमचं ओळखपत्र अपलोड करावं लागेल. तुम्ही लसीकरण केंद्रावर जाऊनदेखील नोंदणी करू शकता. रुग्णालयं, लसीकरण केंद्रांवर गेल्यावरही नोंदणी करता येऊ शकते. पण तिथे गर्दी असण्याची शक्यता असल्यानं ऑनलाईन नोंदणी हा चांगला पर्याय आहे. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्टसारख्या वैध ओळखपत्रांच्या आधारे तुम्ही लसीकरणासाठी नोंदणी करू शकता. 

मोदी सरकारचा मोठा निर्णय
केंद्र सरकारनं लसीकरण अभियानाला वेग देण्यासाठी राज्यं, खासगी रुग्णालयं आणि औद्योगिक संस्थांना थेट लस कंपन्यांकडून साठा खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. पुढील महिन्यापासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याच्या अंतर्गत लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या त्यांच्या केंद्रीय औषध प्रयोगशाळांमधून प्रत्येक महिन्याला तयार होणाऱ्या लसींपैकी ५० टक्के साठा केंद्र सरकारला करतील आणि उर्वरित ५० टक्के साठा राज्य सरकारांसह खुल्या बाजारपेठांमध्ये विकण्याचं स्वातंत्र्य त्यांना असेल.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Covid Vaccination Open For Everyone Above 18 From 1 May What New How To Register

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.