CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग सुस्साट! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण, 1,761 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 09:55 AM2021-04-20T09:55:21+5:302021-04-20T10:02:25+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे.

CoronaVirus Live Updates India reports 2,59,170 new #COVID19 cases, 1,761 in last 24 hours | CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग सुस्साट! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण, 1,761 जणांचा मृत्यू 

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग सुस्साट! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण, 1,761 जणांचा मृत्यू 

googlenewsNext

नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही तब्बल दीड कोटीवर गेली आहे. कोरोनाचा सुस्साट वेग सध्या पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. देशात सध्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग वाढला असून पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाने देशात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दिवसागणिक परिस्थिती ही आणखी गंभीर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात दररोज दोन लाखांहून अधिक कोरोनाच्या नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी (20 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,761 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

कोरोनाचा कहर! ...म्हणून पुढचे 3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे; वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus 2nd Wave) कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 12 दिवसांत पॉझिटिव्हिटी रेट दुप्पट झाला आहे. तर 10 राज्यांत 78 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहेत. देशात कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. यावर तज्ज्ञांनी वेगवेगळी मतं दिली आहेत. पुढील तीन आठवडे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत असं म्हणत तज्ज्ञांनी मोलाचा सल्ला दिला आहे. सेंटर फॉरसेल्युलर अँड मॉलिक्यूलर बायोलॉजीचे संचालक डॉक्टर राकेश मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढचे तीन आठवडे भारतासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. यादरम्यान लोकांना कोरोनाचे नियम हे पाळावे लागतील. ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉक्टर मिश्रा यांनी रुग्णालयामध्ये बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर आणि लसीची कमतरता कायम राहिल्यास देशात भयंकर स्थिती उद्भवेल. त्यामुळे पुढचे तीन आठवडे देशासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

परिस्थिती गंभीर! देशात कधीपर्यंत असणार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर?; तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

लोकांना कोरोनाचे नियम सक्तीने पाळावे लागतील. नाहीतर इटलीची परिस्थिती आपण सर्वांनी पाहिली आहे. इटलीत ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला असं म्हटलं आहे. कोरोनाची दुसरी लाट येणार हे निश्चित होतं. गेल्या काही महिन्यांत अनेकांनी सांगितलं की व्हायरसचा प्रभाव कमी झाला आहे. मात्र हा कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे अशा परिस्थितीसाठी आपण तयार राहायला हवं. भारतात दुसऱ्या लाटेत आलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे संक्रमण वेगाने वाढत आहे, असं मिश्रा यांनी म्हटलं आहे. लोकांनी घराबाहेर पडताना, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणं सोडलं आहे, हे देखील कोरोनाचं संक्रमण वेगाने वाढण्याचं एक मुख्य कारण आहे.

Read in English

Web Title: CoronaVirus Live Updates India reports 2,59,170 new #COVID19 cases, 1,761 in last 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.