CoronaVirus News 12 people died of lack of oxygen in peoples hospital in bhopal | CoronaVirus News: धक्कादायक! ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १२ कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू

CoronaVirus News: धक्कादायक! ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १२ कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू

भोपाळ: देशात कोरोना रुग्णांचा झपाट्यानं वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी देशात पहिल्यांदा एका दिवसात कोरोनाचे १ लाख नवे रुग्ण आढळून आले. त्यानंतर १० दिवसांमध्ये हा आकडा २ लाखांच्या पुढे गेला. काल देशात जवळपास पावणे तीन लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली. कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत असताना दुसरीकडे ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा जाणवू लागला आहे.

१ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया एका क्लिकवर

ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे मध्य प्रदेशातल्या शहडोलमध्ये १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आता असाच प्रकार भोपाळमध्ये घडला आहे. पीपल्स रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे १० ते १२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे रुग्णालयाच एकच खळबळ उडाली. मात्र या वृत्ताचं रुग्णालय प्रशासनानं खंडन केलं आहे. ऑक्सिजन पुरवठा काही वेळासाठी खंडित झाला होता. मात्र त्यामुळे रुग्णांचा मृत्यू झालेला नाही, असं स्पष्टीकरण प्रशासनानं दिलं.

लवकरच नवा नियम; किराणा दुकाने केवळ सकाळी ७ ते ११ पर्यंत

पीपल्स रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता असल्याची तक्रार रुग्णांचे नातेवाईक अनेक दिवसांपासून करत होते. रुग्णालयातील कर्मचारी या गोष्टीची माहिती देऊन रुग्णांना दाखल करून घेत होते. ऑक्सिजनं प्रमाण पुरेसं नसल्यानं रात्री उशिरा किंवा सकाळी ऑक्सिजन संपून जातो. सोमवारी सकाळच्या सुमारास ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्यानं १० ते १२ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं समजतं. रुग्णालय प्रशासनानं हे वृत्त फेटाळून लावलं. ऑक्सिजन पुरवठा कमी-जास्त होत असतो. मात्र रुग्णांच्या मृत्यूला ऑक्सिजनचा तुटवडा जबाबदार नाही. प्रकृती खालावल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे, असं स्पष्टीकरण रुग्णालयानं दिलं आहे.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News 12 people died of lack of oxygen in peoples hospital in bhopal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.