शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
4
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
5
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
6
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
7
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
8
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
9
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
10
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
11
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
12
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
13
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
14
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
15
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
16
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
17
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
18
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
19
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
20
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
Daily Top 2Weekly Top 5

रशियाचं ‘गौडबंगाल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 16:02 IST

चीन आणि रशिया. जगातले हे दोन देश असे आहेत, ज्यांच्याविषयी संपूर्ण जगात कुतुहल आहे. तिथे नेमकं काय चाललंय, हेच लोकांना कळत नाही. कळलं तरी ते खरं असेल का, याविषयीही लोकांच्या मनात कायम शंकाच असते.

ठळक मुद्देएकच मृत्युमुखी? रस्त्यात सिंह सोडले? - हे खरंय?

लोकमत-

चीन आणि रशिया. जगातले हे दोन देश असे आहेत, ज्यांच्याविषयी संपूर्ण जगात कुतुहल आहे. तिथे नेमकं काय चाललंय, हेच लोकांना कळत नाही. कळलं तरी ते खरं असेल का, याविषयीही लोकांच्या मनात कायम शंकाच असते. 
आताही कोरोना व्हायरसनं अख्ख्या जगाला वेड्यात काढलं असताना चीनमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची खरी संख्या किती, याबाबत सूंपर्ण जगात साशंकता आहे. एकीकडे इटलीसारख्या छोट्याशा देशात मृतदेहांचा खच पडत असताना, बलाढय़ चीनमध्ये मृत्युमुखी पडलेली माणसं इटलीपेक्षा कमी कशी, असा प्रo्न जगाला पडला आहे. 
तीच स्थिती रशियाची. कोरोनानं संपूर्ण जगाला आपल्या मरणमिठीत आवळायला सुरुवात केली असताना, रशियात कोरोनानं अजून शिरकाव कसा केला नाही, याचं अनेकांना राहूनराहून आश्चर्य वाटतंय. 
शिवाय रशिया म्हणजे काही इल्लूटिल्लू देश नाही. भौगोलिकदृष्ट्या रशिया हा जगातला सर्वांत मोठा देश. तब्बल सोळा देशांच्या सीमा रशियाला लागून आहेत. त्यात चीनचाही समावेश आहे. रशियाची लोकसंख्याही सतरा कोटीच्या वर. तरीही आजच्या घडीला, म्हणजे मंगळवार, दि. 24 मार्चपर्यंत रशियात कोरोनाबाधित मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आहे केवळ एक आणि बाधित आहेत फक्त 438!
रशिया म्हणतं, आम्ही सुरुवातीपासूनच इतकी काळजी घेतली, की कोरोनाला हातपाय पसरायला जागाच दिली नाही. रशियन प्रेसिडेंट व्लादिमिर पुतीन यांनीही यासंदर्भात नुकतंच भाष्य करताना सांगितलं, सुरुवातीलाच प्रतिबंधक उपाय योजल्यामुळे कोरोनाला आम्ही चांगलाच अटकाव घातला आहे आणि आमच्याकडे परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
रशियन अधिकार्‍यांचंही म्हणणं आहे, चीनमधून सुरुवात झालेल्या कोरोनाची कुणकुण लागल्याबरोबर आम्ही चीनबरोबरची तब्बल 4200 किलोमीटरची सीमा तातडीनं, 30 जानेवारीलाच सिल केली, ठिकठिकाणी क्वॉरण्टाइन झोन्स सुरू केली, तपासणीसाठी शेकडो लॅब उभारल्या, अमेरिकाही मार्चमध्ये जागं झालं, पण आम्ही मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच लोकांच्या तपासण्या सुरू केल्या, आतापर्यंत तब्बल एक लाख साठ हजार लोकांच्या तपासण्याही झाल्या आहेत, चीन, इराण आणि दक्षिण कोरियांच्या प्रवाशांवर सुरुवातीपासूनच अधिक लक्ष दिलं होतं.
रशियाचं म्हणणं खरं असेलही, पण इतिहास दडपण्याचा  त्यांचा  वारसा जुनाच आहे. 1986 ची चेर्नोबिल अनुभट्टी दुर्घटना, 1980मध्ये एचआयव्ही/एड्सची साथ. हा इतिहास लोकांना माहीत आहे. 
आत्ताही कोरोनापासून वाचण्यासाठी लोकांनी घरातच राहावं यासाठी रशियानं तब्बल आठशे सिंह आणि वाघ रस्त्यावर सोडले अशी अफवा झपाट्यानं सोशल मिडियावर व्हायरल झाली. ही अफवाच आहे, हे सिद्ध झालं असलं तरी रशियानं असं केलेलं असू शकतं, यावर लोकांचा आजही विश्वास आहे, कारण रशियाचा इतिहास! रशियानं कोरोनाविरोधात खरंच भक्कम  पावलं उचलली असतील, तर  त्यांचं अभिनंदन, पण आपली प्रतिमाही त्यांनी सुधारायला हवी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या