शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

"संपवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही", नौदल प्रमुख ठार होताच इराण खवळला, इस्रायलला खुली धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:47 IST

Iran Israel war: इराणच्या लष्करातील आणखी एक महत्त्वाचा अधिकारी हवाई हल्ल्यात ठार झाला. कमांडर अलिरेझा तंगसिरी यांच्या मृत्युनंतर इराण खवळला असून, इस्रायला नष्ट करण्याची धमकी दिली आहे. 

इस्रायलच्या सैन्याने चार दिवसांपूर्वी एक माहिती जाहीर केली. इस्रायलच्या आयडीएफने म्हटले होते की, आम्ही केलेल्या हल्ल्यात इराणच्या नौदलाचे कमांडर अलिरेझा तंगसिरी हे ठार झाले आहेत. इस्रायलच्या या दाव्याला चार दिवस लोटल्यानंतर इराणने याबद्दलची माहिती दिली. अलिरेजा तंगसिरी हे हल्ल्यात जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला असे आता इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्सने म्हटले आहे. 

इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात तंगसिरी ठार झाल्यानंतर इराण खवळला. आयआरजीसीने नौदलाचे प्रमुख कमांडर तंगसिरी यांच्या मृत्यूचा बदला घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे सांगत इस्रायलला धमकी दिली आहे. 

आयआरजीसीशी संबधित तस्नीम संस्थेने म्हटले आहे की, "तंगसिरी सैन्याला एकसंध करत होते. बेटे आणि समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा आणखी वाढवत होते. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला." 

"आयआरजीसी नौदलाने तंगसिरी यांच्या मृत्यूनंतरही मोठे हल्ले केले आहेत आणि होर्मुझ सामुद्रधुनीवरील आपले नियंत्रण कायम ठेवले आहे. जोपर्यंत आम्ही शत्रूला पूर्णपणे संपवणार नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही", अशी धमकीच इराणने इस्रायलला या घटनेनंतर दिली आहे. 

अलिरेझा तंगसिरी हे आयआरजीसीमध्ये म्हणजे इराणच्या लष्करातील सर्वात वरिष्ठ कमांडरांपैकी एक होते. ते सध्या होर्मुझ सामुद्रधुनीतून ये-जा करत असलेल्या तेल आणि गॅस जहाजांवर नजर ठेवत होते.

इराकमध्ये मिसाईल हल्ला, विमान उद्ध्वस्त

इराकमध्ये मिसाईल हल्ला करण्यात आल्याची माहिती इराकच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. मोहम्मद अली हवाई तळावर करण्यात आलेल्या मिसाईल हल्ल्यात एक विमान पूर्णपणे नष्ट झाले आहे. 

हा हल्ला सोमवारी (३० मार्च) बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळापासून जवळच ही घटना घडली. या हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू झाल्याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. 

इराकच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की, लष्करी तळांना आणि लष्कराशी संबंधित ठिकाणांवर हल्ले करणे हे भित्रेपणाचे लक्षण असून हे पूर्ण गुन्हेगारी कृत्य आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Iran vows revenge on Israel after naval commander's death.

Web Summary : Iran threatens Israel after the death of naval commander Alireza Tangsiri in an alleged Israeli strike. IRGC vows revenge, stating they won't rest until the enemy is destroyed. Separately, a missile attack in Iraq destroyed a plane.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्धIsraelइस्रायलDeathमृत्यू