शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

साबणाच्या पाण्याने धुवा मोबाईल

By admin | Updated: December 6, 2015 03:24 IST

अरे मी, अंघोळ करतोय अशी थाप मारत एखाद्याचा फोन न घेण्याची युक्ती आता फार काळ खपवून घेतली जाणार नाही. कारण क्योसेरा या जपानी कंपनीने एक वॉटरप्रूफ मोबाइलची निर्मिती

टोक्यो : अरे मी, अंघोळ करतोय अशी थाप मारत एखाद्याचा फोन न घेण्याची युक्ती आता फार काळ खपवून घेतली जाणार नाही. कारण क्योसेरा या जपानी कंपनीने एक वॉटरप्रूफ मोबाइलची निर्मिती केली आहे. हा मोबाइल केवळ वॉटरप्रूफ नसून चक्क साबणाच्या पाण्याने धुता येऊ शकणार आहे.दिवसभर घामाने किंवा घरातल्या, कार्यालयातील धुळीमुळे मोबाइलची स्क्रीन खराब होते. त्यावरील पारदर्शक आवरणाचाही फारसा उपयोग होत नाही किंवा तो कोरड्या फडक्याने पुसण्यापलिकडे आपण काहीच करु श्कत नाही. स्वयंपाकघरातही त्यावर पाणी किंवा तेलासारखे पदार्थ उडतील म्हणून काळजी घ्यावी लागते. यासर्व प्रश्नांवर क्योसरोने डिग्नो रेफ्र नावाच्या मॉडेलद्वारे उत्तर शोधले आहे. हा मोबाइल आपल्याला वापरानंतर स्वच्छ धुता येणार आहे, महत्वाचे म्हणजे टचस्क्रीन भिजल्यावरही त्याच्या स्क्रीनवरील कळ दाबता येता येतात. ४३ अंश से. इतक्या तापमानाच्या गरम पाण्यात पडला तरीही तो चालू राहू शकतो. क्योसरोने याआधीही अत्यंत टीकाऊ उत्पादने बनविली असून, सौरऊर्जेवर चालणाऱ्या फोनचे तंत्रज्ञानही त्यांनी शोधले आहे. (वृत्तसंस्था)अंघोळीच्या वेळेसही मीटिंगकामाच्या व्यापात सतत गुंतलेल्या उद्योजकांना अशा फोनचा नक्कीच उपयोग होऊ शकणार आहे. मोबाईलवर सतत चालू असणाऱ्या कामामुळे मला अंघोळीलाही वेळ मिळत नाही त्यामुळे उशिरा आवरले अशी तक्रार असणाऱ्यांचीही काळजी या फोनने दूर केली आहे. या स्मार्टफोनची किंमत ५७,४२० जपानी येन म्हणजेच ४६५ डॉलर्स इतकी असून तो कोरल पिंक, काश्मिरी व्हाईट आणि मरिन नेव्ही अशा तीन रंगात उपलब्ध आहे.