शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

व्हिसाधारकांच्या जोडीदारास अमेरिकेत नोकरीची मुभा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 4:24 AM

एच-१ बी व्हिसा मिळालेल्या अमेरिकेतील भारतीयांच्या पती किंवा पत्नीला तिथे नोकरी करण्याची मुभा यापुढेही कायम राहणार आहे.

वॉशिंग्टन : एच-१ बी व्हिसा मिळालेल्या अमेरिकेतील भारतीयांच्या पती किंवा पत्नीला तिथे नोकरी करण्याची मुभा यापुढेही कायम राहणार आहे. ओबामा सरकारने केलेल्या या नियमाला अंतरिम स्थगिती देण्यास अमेरिकेतील न्यायालयाने नकार दिला आहे.विशेष कार्यकुशल पदांसाठी अमेरिकेतील कंपन्या विदेशातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात. अशा कर्मचाऱ्यांना एच-१ बी व्हिसा मिळतो. एच-४ व्हिसाधारकांमधील काही प्रवर्गांना विशेषत: एच-१ बी व्हिसाधारकांपैकी जे ग्रीन कार्ड मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, अशांच्या पती किंवा पत्नीला अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी देणारा नियम ओबामा सरकारने २०१५ साली केला होता. त्याचा अमेरिकेत नोकरी करणाºया भारतीयांना विशेषत: त्यांच्या पत्नीला मोठा फायदा झाला होता. मात्र, या नियमाला मूळ अमेरिकी नागरिकांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या या भूमिकेला डोनाल्ड ट्रम्प सरकारनेही पाठिंबा दर्शविला आहे.अमेरिकेच्या कोलंबियातील न्यायालयाने शुक्रवारी या प्रकरणाचा खटला पुन्हा कनिष्ठ न्यायालयाकडे वर्ग केला. एच-१ बी व्हिसाधारकांच्या पती-पत्नीला अमेरिकेत नोकरी करण्यास असलेली मुभा रद्द करावी की नाही, याबद्दलच्या याचिकेवर कनिष्ठ न्यायालयच निर्णय घेईल असे वरिष्ठ न्यायालयाने म्हटले आहे.एच-४ व्हिसाधारकांना वर्कपरमिट देण्याचे धोरण ट्रम्प यांच्याआधीचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी राबविल्याने आपल्या हातातून रोजगाराच्या संधी निसटत असल्याचा मूळ अमेरिकी नागरिकांचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)>नागरिकत्व मिळण्यात अडचणीएच-१ बी व्हिसाधारकांना अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व मिळण्याच्या प्रक्रियेतही अनेकदा विलंब होतो. त्यामुळे या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.त्यावरही कनिष्ठ न्यायालयाने विचार करावा असे कोलंबियातील न्यायालयाने म्हटले आहे.